E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाशिक्षण
व्ही एम एम फाऊंडेशन कडून पळस शाळेत नूतनीकरणाचे काम
रंगरंगोटीमुळे पळस शाळेचा झाला कायापालट

व्ही एम एम फाऊंडेशन कडून पळस शाळेत नूतनीकरणाचे काम
रंगरंगोटीमुळे पळस शाळेचा झाला कायापालट
नागोठणे | महेश पवार
सामाजिक बांधिलकी जपून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या कुर्ला, मुंबई येथील व्ही एम एम फाऊंडेशन कडून नागोठण्याजवळील राजिप शाळा, पळस येथे करण्यात आलेल्या विविध नूतनीकरण कामाचे उद्घाटन नुकतेच रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवरामभाऊ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.

पळस प्राथमिक शाळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्ही एम एम फाउंडेशनचे भारत पाटील, इन्फ्रा मॅनेजर शलाका शिंदे, पळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी शिंदे, मारुती शिर्के, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, पोलिस पाटील बबन शिंदे, पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे, ज्ञानेश्वर शिर्के, कल्पना शहासने, प्रतिभा तेरडे आदी मान्यवरांसह शाळेतील शिक्षक वर्ग व पळसचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पळसच्या इमारतीमधील वर्ग खोल्या, स्वयंपाक गृह, बाहेरील ओटी, प्रवेशद्वार आदी ठिकाणी टाइल्स बसविणे, वर्ग खोल्यांची रंगरंगोटी, शाळेच्या इमारतीला बाहेरील बाजूने आकर्षक चित्रे काढून पळस प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला आहे.




