E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी इम्रान पानसरे
नागोठण्यात धुमधडाक्यात होणार शिवजयंती साजरी

शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी इम्रान पानसरे
नागोठण्यात धुमधडाक्यात होणार शिवजयंती साजरी
नागोठणे : महेश पवार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार (फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया) होणारा जयंती उत्सव शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सर्वच ठिकाणच्या शिवप्रेमींकडून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसारच नागोठण्यातील शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या या शिवजयंती उत्सवासाठी येथील मोहल्ला भागातील कट्टर शिवसैनिक इम्रान पानसरे यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नागोठण्यातील शिवजयंती उत्सव समितीच्या उर्वरित कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष मुकेश भोय व कैलास गोरे, उपाध्यक्ष संजय पाटील व अजित दळवी, सचिव श्रीराम मांगले, सह सचिव अविनाश भोसले, खजिनदार संदीप राऊत, सहखजिनदार बाळू रटाटे, सल्लागार कीर्ती कुमार कळस, जितेंद्र कजबजे, सुहेल पानसरे, मनोज कोळी तर सदस्य म्हणून संतोष घोसाळकर, सचिन रोडेकर, मंगेश वाघमारे, प्रसाद कोळी, नागेश सुर्वे, सलीम अखतार, प्रवीण चितळे, दिनेश वादळ, संदीप शिर्के, रुपेश जगताप या सर्वांची निवड करण्यात आली आहे. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात नागोठणे शिवसेना शाखेत नियोजनाची एक बैठक नुकतीच घेण्यात आली त्यावेळी सर्वानुमते अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीच्या या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नागोठणे
शाखाप्रमुख राजेश सुर्वे, उपशाखाप्रमुख पंकज कामथे, संपर्कप्रमुख मुकेश भोय, शहर संघटक बाळू रटाटे व शिवसेनेच्या नागोठणे शाखेकडून सर्वांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




