E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifउद्घाटन सोहळामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ग्रामीण प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कै. मधूशेठ काळे क्रीडांगणावर दोन दिवस क्रिकेटचा थरार

नागोठणे जी पी एल क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमेश काळे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन 

कै. मधूशेठ काळे क्रीडांगणावर दोन दिवस रंगणार क्रिकेटचा थरार
नागोठणे | महेश पवार
नागोठणे ग्रामीण विभागातील क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण प्रीमियर लीग – २०२६  क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन वजरोली येथील कै. मधूशेठ काळे क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठण्यातील  युवा नेते आणि प्रियदर्शनी चालक-मालक वाहक सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष तसेच या क्रीडांगणाचे मालक प्रथमेश काळे यांच्या हस्ते शनिवारी (दि.११) सकाळी उत्साहात संपन्न झाले. कै. मधुशेठ काळे क्रीडांगणावर दोन दिवस या क्रिकेट स्पर्धेचा थरार क्रिकेटप्रेमींना बघायला मिळणार आहे. 
या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले असून स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात अखिलदादा ताडकर व अमोलदादा ताडकर यांच्या विधी इंटरप्राईजेस, मुरावाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय घेतला. त्यांचा हात निर्णय तुकारामशेठ कदम व प्रकाशशेठ कदम यांच्या केबिजेसी वाघळी (हर्ष हॉटेल) या संघाने चुकीचा ठरवत मुरावाडी संघाचा पराभव केला. उद्घाटनीय सामन्यात वाघळी संघाचा विकास जाधव याचा सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला.
नागोठण्याजवळील वजरोली येथील  कै. मधूशेठ काळे क्रीडांगणावर दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे युवा नेते प्रथमेश काळे,  स्वराज इलेव्हन वांगणीचे संघमालक शेखर ठाकूर, शरयू इंटरप्राईजेस वांगणीचे संघमालक एकनाथ ठाकूर, केबिजेसी वाघळी (हर्ष हॉटेल) चे संघ मालक तुकारामशेठ कदम,  प्रकाशशेठ कदम, आई पळसाई वॉरियर्स निश्चय ११ चेसंघमालक प्रल्हादशेठ राणे व दिनेशभाई इंद्रे, अश्विन फायटर्स वांगणीचे संघ मालक अश्विनदादा तेलंगे, एमडी वॉरियर्स वांगणी चे संघमालक महादेवशेठ दळवी व विराजदादा दळवी, श्री माणकेश्वर प्रसन्न आमडोशी चे संघ मालक अनिरुद्ध जाधव व प्रसाद जांबेकर, विधी इंटरप्राईजेस मुरावाडी चे संघमालक अखिलदादा ताडकर व अमोलदादा ताडकर, किशोरभाई म्हात्रे, मधुकर गायकर,  सुभाष कासार, मोतीराम गायकर, नरेश दळवी,  रत्नमाला लोखंडे आदींसह अनेक मान्यवर व क्रिकेटप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक कमिटीचे अध्यक्ष विश्वास  गायकर, उपाध्यक्ष विकास ठाकूर, सचिव राकेश शेलार,  खजिनदार दिनेश भिसे, सहसचिव राजेश दळवी, सहखजिनदार पवन म्हात्रे, सदस्य आकेश  हरपाल,  राहुल उंबरे,  गणेश राणे,  प्रथमेश कदम,  महेश किर्दत,  राजा नायकोंडे, योगेश कासार, सिद्धेश तेलंगे आदी मेहनत घेत आहेत. स्पर्धेचे उत्कृष्ठ समालोचन राहुल ताडकर व आतिश सारले करीत असून या क्रिकेट स्पर्धेचे यु ट्युबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!