E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

श्रेया कुंटे यांचे अभिनंदन

श्रेया कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती

श्रेया केदार कुंटे यांच्या निवडीबद्दल सुधाकर जवके व सुजाता जवके यांनी केले अभिनंदन  

श्रेया कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती
नागोठणे | महेश पवार
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये भाजपाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा श्रेया केदार कुंटे यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे कौटुंबिक स्नेही असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर जवके व राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नागोठणे शहर अध्यक्षा सुजाता जवके यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या निवडीबद्दल जवके दांपत्यांनी श्रेया कुंटे यांना पुढील राजकीय यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
रायगड जिल्ह्यातील विशेषतः नागोठण्यातील महिला नेतृत्वाला मिळालेल्या या महत्त्वपूर्ण संधीमुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून श्रेया केदार कुंटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात महिला मोर्चाचे संघटन अधिक सक्षम व प्रभावी होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!