E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
वैंकुठशेठ पाटील यांच्याकडून नागोठण्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
पिण्याच्या पाणीपुरवठा संदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना

राजिप कृषी सभापती वैंकुठशेठ पाटील यांच्याकडून नागोठण्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा
पिण्याच्या पाणीपुरवठा संदर्भात अधिकाऱ्यांना केल्या सूचना
नागोठणे | महेश पवार
अंबा नदीला नागोठणे शहर व परिसरात तीन वेळा आलेल्या पुरामुळे झालेल्या व्यापारी, नागरिक व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशू संवर्धन खात्याचे सभापती वैंकुठशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि.१०) दुपारी नागोठणे शहरातील विविध परिसराचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
वैंकुठशेठ पाटील यांनी छ. शिवाजी महाराज चौकातून सुपारी १२.३० वाजता सुरू केलेल्या या पाहणी दौऱ्यात वैंकुठशेठ पाटील यांनी छ. शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला, खुमाचा नाका व परिसरातील पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून नुकसानीचे पंचनामे व इतर बाबतीत माहिती घेतली. तसेच उपस्थित महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्यांचा आढावा घेतला.

नागोठण्यातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नागरिकांचे सध्या हाल सुरू असल्याने वैंकुठशेठ पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच राजिपच्या पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत येथेच थांबा असे सक्त आदेश त्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या रोहा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अमृता उंद्रे – पाटील यांना दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरशेठ जैन, राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपनभाऊ जांबेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, भाजपाचे किशोर म्हात्रे, आनंद लाड, अशोक अहिरे, निखिलशेठ मढवी, बंटी मांडे, दिलीप शहासने, तीरथ पोलसानी, मोरेश्वर म्हात्रे, गणेश घाग, विजय शहासने, कृषी अधिकारी रणजीत लवटे आदींसह महसूल खात्याचे कर्मचारी, व्यापारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.




