E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाटॉप न्यूज़नियुक्तीमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
ॲड. मानसी म्हात्रे यांची निवड
ॲड. मानसी म्हात्रे यांचे वरवठणे शेतकऱ्यांनी केले अभिनंदन !

ॲड. मानसी म्हात्रे यांची रायगड जिल्हा व अलिबाग वकील बारच्या पहिल्या महिला उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
ॲड. मानसी म्हात्रे यांचे वरवठणे शेतकऱ्यांनी केले अभिनंदन !
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. मानसी म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अलिबाग बार असोसिएशनच्या इतिहासात उपाध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला पदाधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल विधी क्षेत्रासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ॲड. मानसी मात्रे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच नागोठण्याजवळील वरवठणे येथील त्यांचे पक्षकार असलेल्या संतोष बैकर, परशुराम बैकर, भगवान राणे, सुनील राणे, मंगेश बैकर आदी शेतकऱ्यांनी केले ॲड. मानसी म्हात्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
ॲड. मानसी म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात कायदेविषयक ज्ञान, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता तसेच वकिली व्यवसायाशी असलेली बांधिलकी यामुळे सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे अलिबाग बार असोसिएशनमध्ये महिलांच्या नेतृत्वाला नवे व्यासपीठ मिळाले असून, विधी क्षेत्रातील महिलांच्या वाढत्या सहभागाचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे. न्यायव्यवस्था आणि वकिली क्षेत्रात महिलांना नेतृत्त्वाच्या संधी मिळणे ही सकारात्मक बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
ॲड. मानसी म्हात्रे यांच्या कार्यक्षमतेवर, प्रामाणिकपणावर, वकील बांधवांप्रती असलेल्या आपुलकीवर तसेच नेतृत्वगुणांवर विश्वास व्यक्त करून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी काळात बार असोसिएशनच्या विविध उपक्रमांसाठी त्या सक्रियपणे योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ॲड. मानसी म्हात्रे यांच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल त्यांचे सहकारी वकील, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




