E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यउद्घाटन सोहळाराज्यलोकल न्यूज़

आरोग्य तपासणी व रक्तदाब शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम 

नागोठण्यातील मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम 
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट एम. पी. सी. टी. हॉस्पिटल, नवी मुंबई आणि यु. एम. सी. ब्लड बँक यांच्या सहकार्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.५) सकाळी १० ते ३ वाजण्याच्या दरम्यान  घेण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात इ. सी. जी. तपासणी, तोंडाचा कॅन्सर तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी आदी तपासण्यांसह तज्ञ डॉक्टरांचा सल्ला यावेळी रुग्णांना मिळाला. या शिबिरात ६० रुग्णांनी सहभाग नोंदविला. तसेच अनेक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.  
नागोठणे विभाग शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास राजिपचे सदस्य सुमितदादा काते, शिवसेना नेते कृष्णा धामणे, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, विजय धामणे, लहू तेलंगे, शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर,  विभागीय संघटक दिनेश घाग, शहर अध्यक्ष संतोष चितळकर,  प्रकाश मोरे, नितीन पत्की, बाळू रटाटे, हरेश धामणे, विनोद धामणे, सलीम अत्तार, अशोक कोतवाल, नागोठणे ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, शिवसेना महिला आघाडी उपतालुका प्रमुख वर्षाताई सहस्रबुद्धे, संतोष कनघरे, निलेश साळवी, संजय कनघरे, संतोष इप्ते, मंदार कोतवाल,  संजय सांगले, नरेश भंडारी आदींसह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व शिवसैनिकांनी केक कापून सुमितदादा काते यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी आदर्श चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर व कर्मचारी तसेच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार अत्याधुनिक !
राजिपचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते यांचा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर हा पहिलाच वाढदिवस होता. मात्र कोणताही दिखावा करून वाढदिवस साजरा न करता आपल्या कामातून व कृतीतून वाढदिवस साजरा करण्याची त्यांची पद्धत असल्यानेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थित ज्येष्ठ शिवसेना नेते कृष्णा धामणे यांनी जिल्ह्यातील मध्यवर्ती व मुंबई गोवा महामार्गालगत असलेले  नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सोयी सुविधांसह अत्याधुनिक करण्याची सूचना करताच कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्याचे आश्वासन यावेळी सुमितदादा काते यांनी दिले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!