E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
वर्षा सहस्रबुद्धे यांची निवड
वर्षा सहस्रबुद्धे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पोलिस मित्र संघटनेच्या रायगड जिल्हा महिला जनसंपर्क प्रमुखपदी वर्षा सहस्रबुद्धे
वर्षा सहस्रबुद्धे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
नागोठणे | महेश पवार
पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार आणि संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांच्या सूचनेनुसार तसेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ पाटील व महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा सुजाता चिंता यांच्या सहमतीने नागोठण्याजवळील निडी (ता. रोहा) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा ओमकार सहस्त्रबुद्धे यांची पोलिस मित्र संघटनेच्या रायगड जिल्हा महिला जनसंपर्क प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

आपल्या पोलिस मित्र संघटनेचे महत्त्व ओळखून आपण पोलिस व नागरिकांना मदत कराल, संघटनेची प्रतिमा जनतेत उज्वल कराल आणि संघटनेचा जनाधार मजबूत कराल असे कार्य आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा वर्षा सहस्रबुद्धे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. पोलिस मित्र संघटनेच्या रायगड जिल्हा महिला जनसंपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल वर्षा सहस्रबुद्धे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.




