E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनधार्मिकनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
विश्वासाला तडा जावू देणार नाही
प्रभाकर तांडेल यांचा मनसे पक्ष वाढविण्याचा निर्धार

मनसे पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : शहराध्यक्ष प्रभाकर तांडेल
प्रभाकर तांडेल यांचा मनसे पक्ष वाढविण्याचा निर्धार
मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केले प्रभाकर तांडेल यांचे अभिनंदन !
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि दूरदृष्टीचा मी आधीपासून चाहता आहे. त्यामुळेच मनसेचा नागोठण्यातील मी खूप आधीपासून एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत होतो. पक्षाने माझी दखल घेऊन माझी मनसेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी निवड करून माझ्यावर एक नवीन जबाबदारी टाकली आहे. त्याबद्दल पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे व पक्ष श्रेष्ठींचा मी आभारी आहे. मनसे पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि नागोठणे शहरात नागरिकांच्या समस्या सोडवितांनाच मनसे पक्ष वाढविण्यासाठी माझे सर्वोतोपरी योगदान मी देईन असा निर्धार मनसेचे नागोठणे शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर तांडेल यांनी व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या शिफारशीनुसार नागोठण्यातील तरुण उद्योजक प्रभाकर तांडेल यांची काही दिवसांपूर्वी मनसेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच मनसेच्या पेण येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसेचे मध्य रायगड जिल्हाध्यक्ष बाळाशेट म्हात्रे यांच्या हस्ते प्रभाकर तांडेल यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर, मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक, रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे, रोहा महिला अध्यक्षा दीपेश्री घासे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रभाकर तांडेल यांनी प्रसार माध्यमांसाजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवडीबद्दल मनसेचे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे, रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर व रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश येरुळकर यांनी प्रभाकर तांडेल यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रायगड जिल्ह्यात संघटन विस्ताराला वेग देत नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणानुसार प्रभाकर तांडेल यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाकर तांडेल यांची शहर अध्यक्षपदाची ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असली तरी ते स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवून आपल्या पदाला न्याय देऊन पुढेही ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व त्यांच्या मित्र परिवारातून व्यक्त करण्यात येत आहे. नागोठणे परिसरातील विविध औद्योगिक प्रकल्प, कंपन्या आणि एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे, यासाठी मनसेच्या माध्यमातून संघटित लढा उभारण्यात येईल, असा निर्धारही शेवटी प्रभाकर तांडेल यांनी व्यक्त केला.




