E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार

नागोठणे | महेश पवार
मार्शल आर्टस् स्पोर्टस् एकॅडमी रायगड व पत्रकार मित्र संघ  यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा पेण येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक,अध्यात्मिक, वैद्यकीय, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात नागोठण्याजवळील कडसुरे येथील ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांना आध्यात्मिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल “महाराष्ट्र रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ह. भ. प. अनिल महाराज शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून ओम आदिनाथ नामधारक सांप्रदायात कार्यरत आहेत. नागोठणे परिसरात सर्वत्र होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये व्यासपीठ ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, कीर्तन साथ गायन, हरिपाठ, भजन, वाद्य वाजन अशा अनेक बाबतीत ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांचा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग असतो. यापूर्वीही २०२५ मध्ये त्यांना प्रवचनकार म्हणून “रायगड कोकण रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या धार्मिक कार्याची दखल घेऊनच ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांना ह. भ. प. मारुती महाराज कोल्हटकर  यांच्या हस्ते “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. अनिल महाराज शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!