E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

धामणे इलेक्ट्रिकलचे विनोद धामणे यांचा गौरव 

महावितरणला केलेल्या सहकार्याबद्दल दिले प्रशस्तीपत्र 

महावितरण कडून धामणे इलेक्ट्रिकलचे विनोद धामणे यांचा गौरव 

महावितरणला केलेल्या सहकार्याबद्दल दिले प्रशस्तीपत्र
नागोठणे | महेश पवार
महावितरण कंपनीच्या रोहा विभागात विविध बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा व महावितरणच्या नोंदणीकृत ठेकेदारांचा सन्मान सोहळा नुकताच रोहा येथे संपन्न झाला. यामध्ये महावितरणच्या नागोठणे विभागातील ठेकेदार व धामणे इलेक्ट्रिकलचे मालक व इलेक्ट्रिकल इंजिनिअर विनोद विजय  धामणे यांनी महावितरण साठी दिलेले महत्वपूर्ण योगदान व  केलेले विशेष सहकार्य यासाठी महावितरणचे रोहा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
इलेक्ट्रिकल इंजिनिअर विनोद विजय  धामणे यांना दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले आहे की, सन २०२५–२६ या वर्षात महावितरणच्या रोहा विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विशेषतः तांत्रिक देखभाल तसेच ग्राहक सेवेत सुधारणा या बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी साधण्यात आली आहे. 
या यशस्वी कामगिरीत ठेकेदार बंधू यांचे मोलाचे सहकार्य, जबाबदारीची जाणीव आणि कार्यनिष्ठा  अत्यंत प्रशंसनीय ठरली आहे. आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विभागाच्या उद्दिष्टांची प्रभावीपणे पूर्तता होण्यास मोठी मदत झाली आहे.
आपल्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल महावितरण रोहा विभागातर्फे आपला सन्मानपूर्वक गौरव करण्यात येत आहे. आपले भविष्यातील कार्यही याचप्रमाणे यशस्वी होवो अशा सदिच्छाही या प्रशस्तीपत्रातून विनोद धामणे यांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला वीजवितरणचे रोहा येथील उप कार्यकारी अभियंता जतीन पाटील, पाली येथील उप कार्यकारी अभियंता बालाजी छत्रे, कोलाड येथील सहाय्यक अभियंता नंदकुमार बल्लाळ, व्यवस्थापक माळी आदींसह महावितरणचे कर्मचारी व अन्य ठेकेदार यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!