E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामनोरंजनयुवाराज्यलोकल न्यूज़
पुरात अडकलेल्या नागरिकांना दिले जीवदान
निसर्ग वन्यजीव रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी

अत्याधुनिक साधनसामुग्री नसतांनाही पुरात अडकलेल्या नागरिकांना दिले जीवदान
निसर्ग वन्यजीव रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील अंबा नदीला आलेल्या पुराने उरूस सर्कल येथे सोमवार दिनांक ६ जुलै रोजी वेढा घातला होता. नागोठण्यात येणाऱ्या व नागोठण्याहून वेलशेत, पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते. अशा वेळी
इंजिन बोट सारखी कोणतीही आवश्यक ती अत्याधुनिक साधनसामुग्री जवळ नसताना केवळ लाईफ जॅकेट आणि रोप दोरी एवढीच साधने जवळ असताना निसर्ग वन्य जीव संवर्धन संस्था रायगड (एनव्हिएसएसआर) या संस्थेच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून व त्यांच्याकडील युक्त्या वापरून उरूस सर्कल येथे सोमवारी(दि.६) सकाळी १० वाजल्यापासून अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली. या सर्व नागरिकांना एनव्हिएसएसआर च्या टीमने रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सुखरूप पाण्याबाहेर काढले. यावेळी त्यांच्या सोबत नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रकाश हंबीर हे सहकार्य करण्यासाठी उपस्थित होते. नागरिकांना सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढणाऱ्या एनव्हिएसएसआर च्या रेस्क्यू टीम मध्ये जयेश बावकर, अखिल शेलार, निखिल शेलार, विनय पारंगे, रोहित पाटील, स्वयम् पारंगे, प्रसाद जाधव, हार्दिक पारंगे, मंदार निंबाळकर, नीरज बावकर, आयुष ताडकर यांचा समावेश होता. या संपूर्ण टीमचे कौतुक होत आहे.





