E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शिक्षण

विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप

इंग्रजी शाळेविषयी पालकांनी मानसिकता बदलणे गरजेचे : महादेवसिंग परदेशी

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप

इंग्रजी शाळेविषयी पालकांनी मानसिकता बदलणे गरजेचे : महादेवसिंग परदेशी
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील माहेरवाशीण असलेल्या कै. श्रद्धा हरी वैद्य (पूर्वाश्रमीच्या पुष्पा साठे) यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती हरी वैद्य (डोंबिवली) यांच्याकडून आणि सौ. वर्षा पाटणकर (पूर्वाश्रमीच्या माधुरी साठे) यांच्याकडून उपलब्ध झालेल्या शालेपयोगी वस्तू, छत्री व खाऊचे  वाटप नागोठण्यातील राजिप कचेरी शाळा, राजिप कन्याशाळा व राजिप प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर (गावठाण) या तीन शाळांतील सुमारे ७२ विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच जोगेश्वरी नगर शाळेसाठी शुद्ध पाण्याचे फिल्टर यावेळी देण्यात आले.  तर जोगेश्वरी नगर शाळेतील १ ली ते ४ थी पर्यंतच्या वर्गातील पहिल्या दोन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कै. मो. दे. शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उल्हास शिंदे यांच्याकडून रोख बक्षीस देण्यात आले. 
नागोठण्यातील केंद्रीय शाळा क्रमांक १ (कचेरी शाळा) येथे शुक्रवारी (दि.२१) सकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे
सचिव उल्हास शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.  या कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, सदस्या सुप्रिया काकडे, पूनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, खजिनदार दिलीप शहासने, सचिव उल्हास शिंदे, सदस्य दत्ता कडव, सुभाष भोय, सोनू जोशी, दीपक लोणारी, केंद्रप्रमुख सुनील मोंढे,  कचेरी शाळेच्या मुख्याध्यापिका समा शेळके, शिक्षिका ज्योती सैदाने,  कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विजया धनवडे, शिक्षिका कृती पडवळ, जोगेश्वरी नगर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी चौवरे, कचेरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुगंधा राजेश पिंपळे आदींसह विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव सिंग परदेशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इंग्रजी ही काळाची गरज असली तरी यापूर्वी अनेकांनी मराठी शाळेतूनच शिक्षण घेऊन ते उच्च पदावर पोहोचले आणि पुढे गेले.  मराठी भाषेला आज अभिजात भाषेच्या दर्जा मिळाला आहे. मराठी शाळेतूनही आज मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामुळे त्याचा मुलगा इंग्रजी शाळेत शिकतो म्हणून आपणही आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत पाठविणे ही मानसिकता पालकांनी बदलण्याची गरज असल्याचे मत यावेळी महादेवसिंग परदेशी यांनी व्यक्त केले. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
नागोठण्यातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कचेरी शाळा, कन्या शाळा व जोगेश्वरी नगर शाळेतील एकूण ७२ विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रत्येकी दफ्तर, वह्या, कंपास पेटी, रंगपेटी, छत्री व खाऊचे वाटप करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!