E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजकारणराज्य

एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे उजळले 

खासदार सुनील तटकरे यांचे नागरिकांनी मानले आभार

खा. सुनील तटकरेंच्या दणक्याने एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे उजळले 

खासदार सुनील तटकरे यांचे नागरिकांनी मानले आभार
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नागोठण्यातील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे खासदार सुनील तटकरे यांच्या दणक्याने उजळले आहेत. संध्याकाळ पर्यंत पथदिवे सुरू करा आणि त्याचा निरोप मला लगेच पाठवा अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना शनिवारी (दि.३) दुपारी ठणकावले होते. त्याची दखल घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू केले आणि त्याचा व्हिडिओ खासदार सुनील तटकरे यांना पाठविला. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर खासदार सुनील तटकरे यांच्या असलेल्या दराऱ्याचे सर्वत्र कौतुक होत असून पथदिवे सुरू झाल्याने नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत. 
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असतांंनाच नागोठणेकरांवरील प्रेमाखातर एक विशेष बाब म्हणून मंजूर केलेली आणि काही तांत्रिक कारणाने बंद अवस्थेत असलेली नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन नागोठणे ग्रामपंचायत सभागृहात शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. मात्र बैठकीला येण्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वस्तुस्थिती जाणून घेण्याला प्राधान्य दिले होते. याच पार्श्वभूमीवर योजनेच्या संदर्भात शनिवारी नागोठणे दौऱ्यावर आलेल्या खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर प्लांटची सुद्धा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
फिल्टर प्लांटकडे जात असताना एमआयडीसी रस्त्यावरील पथदिवे खूप कालावधीपासून बंद असल्याचे स्थानिक नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पथदिवे बंद असल्याने सकाळच्या वेळी या रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जाणारे नागरिक, गुरे चरावयास येणारे शेतकरी, गुराखी, रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतावर जाणारे शेतकरी, महिला यांना दररोज पहाटेच्या वेळी तसेच सायंकाळी काळोखातून चालत जावे लागत होते. पायी चालत असताना सर्वांच्या मनात वेगळ्या प्रकारची भीती निर्माण होत असे. या सर्व बाबी स्थानिक नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील पथदिवे तातडीने सुरू करण्याची तंबी दिली होती. त्याचीच दखल घेत जॅकवेल ते वांगणी रेल्वे पुलापर्यंतचे हे पथदिवे तांत्रिक दोष तातडीने दूर करून सुरू करण्यात आल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!