E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़सहकार

संस्था ‘अ’ वर्गात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

दिवाळीपूर्वी प्रत्येकी १ हजार रुपये सानुग्रह अनुदान

नागोठणे भातगिरणी संस्था ‘अ’ वर्गात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू

दिवाळीपूर्वी प्रत्येकी १ हजार रुपये सानुग्रह अनुदान
नागोठणे | महेश पवार 
नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेली संस्था असून, संस्थेचे सुमारे १ हजार सभासद आहेत. संचालक मंडळाचे कुशल मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीमुळे संस्थेचे कामकाज प्रगतिपथावर असून, संस्थेच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये समाधान असल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेतील मोठ्या उपस्थितीवरून दिसून आले. संस्थेला ऑडिटमध्ये ‘ब’ वर्ग प्राप्त झाला असला तरी, आगामी काळात संस्थेची आर्थिक व प्रशासकीय प्रगती साधून संस्थेला ‘अ’ वर्गात आणण्यासाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास सभापती सदानंद गायकर यांनी व्यक्त केला.
नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेला यावर्षी १४ लाख ६४ हजार रुपये नफा प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.  दरम्यान, संस्थेचे सल्लागार मारुती देवरे यांनी सभासदांना एक हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावा असा ठराव मांडला त्यास खंडू ठाकूर यांनी अनुमोदन दिले. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सभासदांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करताना कायदेशीर पूर्तता पूर्ण करून दिवाळीपूर्वी प्रत्येक सभासदाला १ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे सभापती सदानंद गायकर यांनी जाहीर केले. या निर्णयाचे उपस्थित सभासदांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभापती सदानंद गायकर, सल्लागार भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, मधुकर ठमके, मारुती देवरे, कृष्णा धामणे, अनंत वाघ, खंडू ठाकूर, लहू तेलंगे, ॲड. महेश पवार, संस्थेचे सचिव अनिल पवार यांच्यासह संचालक मंडळाचे सर्व सदस्य तसेच शेतकरी पुरुष व महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेला ऑडिटमध्ये ‘ब’ वर्ग प्राप्त झाला असला तरी, आगामी काळात संस्थेची आर्थिक व प्रशासकीय प्रगती साधून संस्थेला ‘अ’ वर्गात आणण्यासाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वास सभापती सदानंद गायकर यांनी व्यक्त केला. संस्थेची वाटचाल अधिक सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक आणि प्रगतिशील करण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही सदानंद गायकर यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!