Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

हजरत मीरा मोहिद्दीन शहाबाबा स्वागत कमान लवकरच नव्याने बांधण्यात येईल 

उपसरपंच अखलाक पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती 

कमकुवत झाल्याने तोडण्यात आलेली हजरत मीरा मोहिद्दीन शहाबाबा स्वागत कमान लवकरच नव्याने बांधण्यात येईल 

नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांची पत्रकार परिषदेत माहिती 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे ग्रामपंचायती कडून सन २००९/१० च्या विकास फंडातून बांधण्यात आलेली आणि नागोठण्यातील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच नागोठण्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत  मीरा मोहिद्दीन शहाबाबा दर्गा यांच्या नावाने असलेली स्वागत कमान कमकुवत झाल्यानेच तोडण्यात आली. यासाठी मुस्लिम समाजातील लोकांना विश्वासात घेऊन व उरुसाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना आणि जीवितहानी घडू नये यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयात दुसरे कोणतेही तथ्य नसून याच जागेवर नव्याने स्वागत कमान उभारण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे ठोस आश्वासन नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांनी दिले असून कमानी संदर्भात उठलेल्या वावड्यांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. 
नागोठणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात यासंदर्भात  संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेला नागोठणे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक उपस्थित होते. यासंदर्भात अधिक माहिती देताना उपसरपंच अखलाक पानसरे यांनी सांगितले की, मुंबई गोवा महामार्गावरून नागोठण्यात आणि मीरा मोहिद्दीन शहाबाबा दर्ग्याकडे येण्याच्या मार्गावर असलेली ही स्वागत कमानी कमकुवत झाल्याने त्या ठिकाणी नव्याने कमानी बांधण्याचा ठराव दोन वर्षांपूर्वीच्या ग्रामसभेत घेण्यात आला होता. मात्र निधी अभावी ग्रामपंचायतीला हे काम करणे शक्य झाले नव्हते. कोकणातील सर्वात मोठा उरूस समजला जाणाऱ्या नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शहा बाबांच्या दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी भरणाऱ्या उरुसाची तयारी सुरू असतानाच उरुसाच्या काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी कोणत्यातरी अज्ञात वाहनाने कमानीला धडक दिल्याने कमानीची पडझड झाल्याचे मुस्लिम समाजातील काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मी स्वतः समाजातील काही लोकांना सोबत घेऊन जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर तत्काळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश टेमघरे व सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्याशी संपर्क साधून त्यांना तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयात येण्याची विनंती केली. त्यावेळी आमच्यात झालेल्या चर्चेअंती सदर कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे ठरल्याने सरपंच व ग्रामसेवकांच्या सहीचे पत्र
घेऊन मी रोहा पंचायत समितीच्या उप अभियंत्यांना भेटलो. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास तीन ते चार महिने लागतील त्यापेक्षा तुम्ही ग्रामपंचायतीच्या अधिकारात सदर पडझड झालेली कमानी तोडू शकता अशी सूचना त्यांनी त्यावेळी केली होती.  त्यानंतरच  ग्रामपंचायतीच्या अधिकारात ही कमान तातडीने  तोडण्यात आली होती.
ही स्वागत कमानी नागोठणे ग्रामपंचायतीने बांधलेली असली तरी ही कमानी हजरत मीरा मोहिद्दीन शहाबाबा यांच्या नावाने असल्याने तसेच ५ व ६ एप्रिल रोजी नागोठण्यातील उरूस भरणार असल्याने त्याठिकाणी  नागोठणे ग्रामीण विभाग तसेच जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ऊरुसात येणारे नागरिक याच कमानीतून येणार असल्याने ही कमकुवत झालेली कमान पडून ऊरुसात येणाऱ्या सर्व धर्मीय नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला तर नागोठणे ग्रामपंचायतीलाच जबाबदार धरले जाईल. त्यामुळे ऊरुसात येणाऱ्या जनतेच्या जीवाला धोका पोहचू नये यासाठीच मुस्लिम समाजातील लोकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही कमकुवत झालेली कमान तोडण्याचे काम करण्यात आले आहे. दरम्यान ही स्वागत कमानी नव्याने बांधण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी या आधीच ग्रामपंचायतीकडे अर्ज केला असून त्या अर्जाचा सन्मान राखून ही स्वागत कमानी नव्याने  बांधण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची ग्वाही यावेळी उपसरपंच अखलाक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!