E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifऐतिहासिकधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

शेठ ओ. एस. परमार अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

शेठ ओ. एस. परमार अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

नागोठणे | महेश पवार

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शेठ श्री. ओटरमल शेषमल परमार कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनीरिंग महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेसह काढलेल्या भव्य रॅलीने झाली. लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी आकर्षक सादरीकरण करत “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोरशेठ जैन, सीईओ कार्तिक जैन व सौ. संगिता जैन यांच्या प्रमुख  उपस्थितीसह रजिस्ट्रार वैभव नांदगावकर, प्राचार्य विशाल पाटील आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाची संगणक शाखेची विद्यार्थिनी श्रावरी म्हात्रे हिने “झुलवा पाळणा  बाळ शिवाजीचा” हे भावपूर्ण गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. महाविद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक महेश जांबेकर यांनी “जय जय महाराष्ट्र माझा” हे देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. तसेच संगणक शाखेचा विद्यार्थी अथर्व थळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेविषयी प्रेरणादायी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.आय. शाखेची विद्यार्थिनी अनुष्का लोखंडे हिने उत्कृष्टरीत्या केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!