Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

ऐनघर फाटा येथील दुभाजक पूर्ववत सुरू 

राजिप सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांचे प्रयत्न 

ना. भरतशेठ गोगावले यांच्या दणक्याने मुंबई गोवा महामार्गावरील ऐनघर फाटा येथील दुभाजक पूर्ववत सुरू 

राजिप सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांचे प्रयत्न 
नागोठणे | महेश पवार
मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचा असलेल्या नागोठण्याजवळील ऐनघर फाटा येथील दुभाजक राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्या दणक्याने सुरू करण्यात आला आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार महामार्गाच्या ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेला हा महत्वाचा दुभाजक पूर्ववत सुरू करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित  सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी यासंदर्भात ना. भरतशेत गोगावले यांच्याशी भ्रमणध्वनीवर  संपर्क केल्यानंतर भरतशेठ गोगावले यांनी तात्कळ दिलेल्या आदेशानुसार शनिवारी (दि.२५) सकाळी हा दुभाजक सुरू करण्यात आला. 
उपलब्ध माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावरील नागोठण्याजवळील ऐनघर फाटा येथील या दुभाजकासमोर बुधवारी(दि.२२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास  सुकेळी बाजूकडून या दुभाजकातून ऐनघरकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला नागोठणे बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने ऐनघरकडे जाणाऱ्या दुचाकीवरील एक तरुण व तरुणी जखमी झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा दुभाजक पोलिस प्रशासनाने केलेल्या सूचनेनुसार महामार्गाच्या ठेकेदार कंपनीकडून बंद करण्यात आलं होता.  मात्र त्यामुळे या दुभाजकाचा वापर करून ऐनघर, हेदवली, तामसोली, सावरट, कानसई आदिवासी वाडीसह इतर आदिवासी वाड्यातील स्थानिक नागरिक व वाहन चालकांना एक किलोमीटर लांबीचा वळसा मारून ऐनघर व इतरत्र जावे लागत होते.
दुभाजक बंद करणे हा काही पर्याय नाही हे लक्षात आल्याने आणि नागरिकांच्या या मोठ्या समस्येची तत्काळ दखल घेत जिल्हा परिषदेचे सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुकाप्रमुख मनोज दादा खांडेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.  भरतशेठ गोगावले यांना तत्काळ फोन लावून हा दुभाजक सुरू केला आहे.  यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी निखिल कुमार, बहादुर सिंग, ऐनघर येथील शिवसेना कार्यकर्ते नरेंद्र मोहिते, चेतन मोहिते, रवि यादव, निलेश पार्टे, संदेश गायकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ऐनघर फाटा येथील दुभाजकाची समस्या मार्गी लागल्याने  ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून ना. भरतशेठ गोगावले, राजिप सदस्य सुमितदादा काते, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!