E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
शुद्ध पाणीपुरवठा योजना लागणार लागणार मार्गी
नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव निधीबाबात मंत्रालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

खा. सुनील तटकरे यांच्यामुळे नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना लागणार लागणार मार्गी
नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव निधीबाबात मंत्रालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
वाढीव निधीचा प्रस्ताव आठवडाभरात सादर करण्याचे आदेश
नागोठणे | महेश पवार
नागोठणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव निधीच्या संदर्भात खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे अप्पर सचिव पराग जैन यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयातील पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अप्पर सचिव पराग जैन यांच्या दालनात मंगळवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकनेते सुनील तटकरे यांनी स्वतः मोबाईल कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभाग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यामुळे नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना लवकरच मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मुंबईतील नवीन मंत्रालयातील राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाचे अप्पर सचिव पराग जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार संपन्न झालेल्या या बैठकीत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मोबाईल कॉन्फरन्स कॉल द्वारे या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, किशोरभाई जैन, सरपंच सुप्रियाताई महाडिक, ग्रामपंचायत अधिकारी गोविंद शिद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब टके, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, भाविका गिजे, विनिता पाटील आदींसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन योजना, तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा खात्याचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

खासदार सुनील तटकरे यांनी या महत्वपूर्ण बैठकीत अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनुसार नागोठणे शहराचा वाढत असलेला विस्तार पाहता या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये सदर पाणीपुरवठा योजना रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली राबविण्यात येणार आहे, योजनेसाठी आवश्यक असलेला संपूर्ण नवीन प्रस्ताव जिल्हा परिषद, रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात येणार आहे, नवीन प्रस्तावासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव घेण्यात येणार आहे, पाणीपुरवठा योजनेवरील वीज खर्च कमी करण्यासाठी सोलर सिस्टीम बसविण्याबाबत ग्रामपंचायतीचा स्वतंत्र ठराव घेण्यात येणार आहे, सोलर सिस्टीम या योजनेच्या जॅक वेल जवळ आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट (WTP) जवळ बसविण्याचे नियोजनाअंती ठरविण्यात आले आहे.

नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण परिपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या आवश्यक प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करून अप्पर सचिव पराग जैन पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. सदर प्रकरणाचा पाठपुरावा करून नागोठणेच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्या खास प्रयत्नातून संपन्न झालेल्या या बैठकीत अप्पर सचिव पराग जैन यांनी नागोठण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आवश्यक असलेली तरतूद आत्ताच करून घ्या. नंतर पुढील पंचवीस वर्ष पाण्यासाठी निधी उपलब्ध होणार नाही अशा सक्त सूचना केल्याने नागोठणे ग्रामपंचायतीचे आवश्यक ते ठराव घेणे, सोलर सिस्टीमबाबत स्वतंत्र ठराव करणे आणि त्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत संपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार आहे. नागोठणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला आता ठोस प्रशासकीय दिशा मिळाली असून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी पुढील कार्यवाहीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी शासन स्तरावर सांगण्यात आले.




