
जनसेवा ही माझ्या रक्तामध्ये आहे – ला. विलास चौलकर
विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देणार
विलास चौलकर यांनी नागोठणे लायन्स क्लब अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
नागोठणे | महेश पवार
नागोठणे लायन्स क्लबच्या सुजाता जवके अध्यक्ष असताना सन २०१९–२० मध्ये सुधाकर जवके यांनी मला लायन्स क्लबचे सदस्य केल्यानंतर क्लबमध्ये मी चांगल्याप्रकारे रुळलो. लायन्स क्लबच्या Together We Serve या ब्रीदवाक्याप्रमाणे सेवा करीत राहिल्याने नागोठणे लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला आज मिळाली आहे. नागोठणे गावाचा सरपंच, अष्टविनायक पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून सेवा करतच आलो असल्याने आणि जनसेवा ही माझ्या रक्तात असल्याने आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सेवा करत राहणार असल्याचे प्रतिपादन नागोठणे लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच वर्षभरात राबविणार असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही विलास चौलकर यांनी यावेळी दिली.

नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर
नागोठणे लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून नेहमी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबरोबरच कॅन्सरगस्त रुग्णांसाठी जागृतीपर कार्यक्रम राबवून त्यांना मुंबईतील टाटा कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलमध्ये उपचार मिळविण्यासाठी सहकार्य करण्याबरोबरच लागोठणे लायन्स क्लब मध्ये जास्तीत जास्त नवीन सदस्य करून क्लबची सदस्य संख्या ५० च्या वर नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे यावेळी नागोठणे लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर यांनी स्पष्ट केले.

या पदग्रहण सोहळ्यात नागोठणे लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष सखाराम ताडकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. यावेळी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व इन्स्टॉलिंग ऑफिसर ला. मुकेश तनेजा यांनी नागोठणे लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर यांना पदग्रहणाची शपथ दिली. नागोठणे लायन्स क्लबच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष ला. विलास चौलकर, उपाध्यक्ष ला. सुधाकर जवके, सेक्रेटरी ला. डॉ. अनिल गिते, खजिनदार ला. दिपक गायकवाड, सहा. सेक्रेटरी विजय शहासने, सेकंड उपाध्यक्ष विनोद सावंत, उपखजिनदार ला. विद्या म्हात्रे यांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी जीएसटी को-ऑर्डिनेटर व पीएमजेएफ ला. अनिल म्हात्रे यांनी यावेळी इंडक्शन ऑफिसर म्हणून काम पाहिले. त्यांनी नवीन सदस्य म्हणून विनोद दुबे, रतन हेंडे, अनुराधा शहासने व ॲड. महेंद्र धामणे यांना शपथ देऊन लायन्स परिवारात सहभागी करण्यात आले. यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर ला. मुकेश तनेजा यांनी नवीन कार्यकारिणीला त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. मावळते अध्यक्ष सखाराम ताडकर यांना वर्षभरातील आपल्या कार्याचा व सर्वांनी केलेल्या सहकार्याचा लेखाजोखा मांडतांना व सर्वांचे आभार मानताना भारावून आले. पदग्रहण सोहळ्याच्या सुरुवातीलाच नागोठणे लायन्स क्लबचे सचिव लायन अनिल गीते यांनी क्लबच्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी लायन्स परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

नागोठण्याजवळील चिकणी येथील हॉटेल गुलमोहर मधील सभागृहात शुक्रवारी (दि. १९) रात्री संपन्न झालेल्या नागोठणे लायन्स क्लबच्या या ३२ व्या पदग्रहण सोहळ्याला पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. मुकेश तनेजा, जीएसटी को-ऑर्डिनेटर ला. अनिल म्हात्रे, रिजन चेअरपर्सन ला. विद्या अधिकारी, झोन चेअरपर्सन ला. मंजुषा कुद्रीमोती, रायगड जिल्हा परिषदेचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, गवळी समाज जिल्हाध्यक्ष राजेश मेहतर, नागोठणे लायन्स क्लब अध्यक्ष ला.विलास चौलकर, माजी अध्यक्ष ला. सखाराम ताडकर, एमजेएफ ला. सुधाकर जवके, एमजेएफ ला. यशवंत चित्रे, एमजेएफ ला. विवेक सुभेकर, ला. प्रकाश जैन, ला. विनोद सावंत, ला. डॉ.अनिल गिते, ला.दिपक गायकवाड, ला. सुनिल कुथे, ला. विजय शहासने ला. संतोष शहासने, ला. दौलतराम मोदी, ला. जयराम पवार, ला. पांडूरंग शिंदे, ला. सुजाता जवके, ला. श्वेता चौलकर, ला. विशाल शिंदे, ला. विवेक करडे, ला.पुजा शिंदे, ला. अजित काळे, ला.अतुल काळे, ला.अमित मोदी, विलास चौलकर यांचे हितचिंतक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन एमजेएफ लायन विवेक सुभेकर व लायन विजय शहासने यांनी केले. तर कुमारी वैष्णवी देशमुख हिने कराओके गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.





