E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

विवेक सुभेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 

विवेक सुभेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 

नागोठणे | महेश पवार

मार्शल आर्टस् स्पोर्टस् एकॅडमी रायगड व पत्रकार मित्र संघ यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा पेण येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक,अध्यात्मिक, वैद्यकीय, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात नागोठण्यातील विवेक सुभेकर यांना त्यांच्या मागील ३० वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून “महाराष्ट्र रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विवेक सुभेकर यांनी मागील ३० वर्षांत लायन्स क्लब इंटर नॅशनल, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती– जिल्हा रायगड, रायगड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन,  राज्य फोटोग्राफर्स असोसिएशन ग्रुप – महासंघ महाराष्ट्र राज्य
अशा अनेकविध संस्थावर विविध पदांच्या माध्यमांतून  काम करीत सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवा केली आहे. यासाठी विवेक सुभेकर याांना अॅड. मंगेश नेने यांच्या हस्ते “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन खात्याचे सभापती वैकुंठशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रोहा तालुका अध्यक्षा प्रीतमताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मार्शल आर्टस् स्पोर्टस् एकॅडमी रायगड व पत्रकार मित्र संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. विवेक सुभेकर यांना मिळालेला हा सहावा पुरस्कार असून या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!