E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

नागोठण्यात फैज अधिकारी ९२.४० टक्के गुणांसह प्रथम

अग्रवाल विद्यामंदिर, रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, उर्दू हायस्कूलचे यश

नागोठणे उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.५५ टक्के  
कुमार फैज अधिकारी ९२.४० टक्के गुणांसह प्रथम 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे :  रोहा तालुक्यातील उर्दू माध्यमाचे एकमेव हायस्कूल असलेल्या नागोठण्यातील नामांकित नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूलचा दहावीच्या परीक्षेचा  निकाल ९६.५५ टक्के  लागला आहे.  यामध्ये कुमार फैज नझीर अधिकारी हा विद्यार्थी ९२.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर कुमारी नाफिया बहद छडीदार (९० टक्के) व कुमारी झैबा तनवीर अधिकारी (८७ टक्के) या दोन विद्यार्थिनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी उर्दू हायस्कूलचे २९  विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उच्च प्रथम श्रेणीत ९,  प्रथम श्रेणीत १३, द्वितीय श्रेणीत ३ तर उत्तीर्ण श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नागोठणे उर्दू हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समादशेठ अधिकारी, जनरल सेक्रेटरी लियाकत शैख अलि कडवेकर, व्यवस्थापकीय संचालक सगिर अधिकारी,  शब्बीर पानसरे, डॉ.सादिया दफेदार, शाळेचे प्राचार्य,  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कोएसोच्या अग्रवाल विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९१.५४ टक्के  
कुमारी प्रांजली चौलकर ९१.६० टक्के गुणांसह प्रथम 
नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.८) सकाळी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.  यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिरचे इयत्ता  दहावीतील १४२ पैकी १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा शेकडा निकाल ९१.५४ टक्के लागला आहे.  शाळेतील कुमारी प्रांजली योगेंद्र चौलकर ही विद्यार्थिनी ९१.६० टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर कु. प्रथम जितेंद्र माळी (९०.२० टक्के), कुमारी वैदेही प्रभाकर म्हात्रे (९० टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.  तसेच कुमारी निमिषा नितीन भोईर (८७.२० टक्के) व कुमारी श्रद्धा प्रमोद चोगले (८५.४० टक्के) या विद्यार्थिनी अनुक्रमे चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाल्या आहेत.  शाळेतील २४ विद्यार्थी उच्च प्रथम श्रेणीत,  ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,  ३९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १९  विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अग्रवाल विद्यामंदिरच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक शाळा समितीचे चेअरमन नरेंद्रशेठ जैन, मुख्याध्यापक डी.एम.पवार, वरिष्ठ लिपिक संतोष गोळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रिलायन्स फाउंडेशन स्कूलचा १०० टक्के निकाल
कुमारी स्वरा कुथे ८९.४० टक्के गुणांसह प्रथम 
नागोठणे  : येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूल या मराठी माध्यम शाळेचे सर्व ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकालही १०० टक्के लागला आहे. यामध्ये कुमारी स्वरा संजय कुथे ही विद्यार्थिनी ८९.४० टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.  तर कुमारी सानिका मधुकर पाटील (८७.६० टक्के) व कुमारी कृपा चंदन गोळे (८७.२० टक्के)  या विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेतील १४ विद्यार्थी उच्च प्रथम श्रेणीत, २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिलायन्स फाउंडेशनच्या शाळा समितीचे अध्यक्ष शशांक गोयल व प्राचार्य प्रा. योगेश परचुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!