E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़धार्मिकनिधनलोकल न्यूज़
आमदार अनिकेतभाई तटकरे यांची सांत्वनपर भेट
भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांची आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली सांत्वनपर भेट

भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांची आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी घेतली सांत्वनपर भेट
नागोठणे : नागोठण्याजवळील आमडोशी गावातील रहिवासी तथा भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर यांच्या मातोश्री कविता उत्तम जांबेकर (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने जांबेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुःखद प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व तथा तरुण कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ, विधान परिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आमडोशी येथे जाऊन सोपानभाऊ जांबेकर व त्यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी जांबेकर कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी होत त्यांना धीर व आधार दिला.
यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासमवेत मयूर खैरे, प्रमोद जांबेकर, राजेंद्र जांबेकर, अमित जांबेकर, प्रकाश रेवाले, प्रमोद भोसले, अनिरुद्ध जाधव, प्रवीण जांबेकर, महेश जांबेकर, जयराम घरट, कृष्णा घरट यांच्यासह आमडोशी ग्रामस्थ उपस्थित होते.





