E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

मोक्ष भांगरे याचे यश

नागोठण्यातील कै. अ. जे. जैन प्राथमिक शाळेचा कु. मोक्ष भांगरे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पाचवा तर रोहा तालुक्यात पहिला 

नागोठणे | महेश पवार
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील कै.अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी कु.मोक्ष कमल भरत भांगरे हा विद्यार्थी सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्ह्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर रोहा तालुक्यात कुमार मोक्ष भांगरे याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. 
कु. मोक्ष भांगरे याने या शिष्यवृत्ती परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळविले असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. कु.मोक्ष भांगरे या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, वर्गशिक्षक राहुल भवर, शिक्षिका राजश्री जाधव, विजया पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल कु. मोक्ष भांगरे याचे बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल शाळा समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, प्राथमिक विभाग शाळा समितीचे अध्यक्ष अनिलशेठ काळे, सदस्य जयराम पवार, सुभाष जैन, ॲड. सोनल जैन यांनी अभिनंदन केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!