E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

आदिवासी समाज मंदिर उभारणार

जागतिक आदिवासी नागोठण्यात उत्साहात साजरा

खा. सुनील तटकरेंच्या माध्यमातून आदिवासी समाज मंदिर उभारणार : किशोरभाई जैन 

जागतिक आदिवासी दिन नागोठण्यात उत्साहात साजरा
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलात दरवर्षी २५ ते ३० आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय फी व्यतिरिक्त इतरही विशेष सवलतही दिली जात आहे. हे विद्यार्थी तंत्रशिक्षण घेऊन नोकरीत रुजू होत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबही सावरायला मदत होत आहे. याशिवाय आदिवासी बांधवांची कार्यक्रमात करण्यात आलेली  मागणी लक्षात घेता या मागणीला प्रतिसाद देताना खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आदिवासी व ठाकूर समाज बांधवांसाठी सुसज्ज समाज मंदिर बांधून देण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी दिले. 
९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन नागोठण्यात  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने नागोठण्यातील सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित आदिवासी बांधवांना किशोरभाई जैन यांनी संबोधित केले. या कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडवले. या निमित्ताने लायन्स क्लब अलिबाग यांच्या तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिरही पार पडले. या उपक्रमांचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमापूर्वी  सकाळी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते कार्यक्रम स्थळापर्यंत वाजत-गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. 
या जागतिक आदिवासी दिन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, सपोनि रविंद्र पारखे, गटविकास अधिकारी चिमाजी हंबीर, रोहा तालुका आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्था रोहा तालुका अध्यक्ष गोविंद शिद, उपाध्यक्ष महेंद्र हंबीर, खजिनदार काशिनाथ शिद, सहखजिनदार धर्मेंद्र शिद, सचिव कमलाकर बांगारा , सहसचिव लक्ष्मण सुतक, कार्याध्यक्ष मच्छिंद्र लेंडी,  विभाग प्रमुख केशव शिद, सदस्य गणपत पारधी, मधुकर निरगुडे, बाबू शिद, तानाजी वारगुडे, विनोद निरगुडे, सुभाष हंबीर, पांडुरंग शिद, दिनेश कातकरी, लक्ष्मण सुतक,  मधुकर पारधी, जानू हंबीर, होनाजी हंबीर  जानू वारगुडे, किसन शिद, लक्ष्मण हंबीर, होनाजी हंबीर, मधुकर लेंडी, विश्वनाथ वारगुडे, आरती वाघमारे, लता हंबीर यांच्यासह रोहा तालुका, पेण तालुका व नागोठणे विभागातील आदिवासी ठाकुर समाजातील नोकरवर्ग, निवृत्त शासकीय कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षाचे व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आपली संस्कृती व अस्तित्व कायमस्वरूपी जतन करण्यासाठी भविष्यात नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.  कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आल्याने आदिवासी समाजाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच समाजातील एकोपा अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी ठाकुर उन्नती सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य व आदिवासी बांधवांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!