Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

पत्रकार असोसिएशन आक्रमक 

पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे खा. संजय पाटील यांचा केला निषेध  

खासदार संजय पाटील यांच्या विरोधात नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशन आक्रमक 

खासदार संजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नागोठणे पोलिस ठाण्याला निवेदन 
पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे खा. संजय पाटील यांचा केला निषेध  
नागोठणे | महेश पवार
शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उबाठा शिवसैनिकांना उद्देशून बेताल वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आक्रमक झाले.  त्यांनी पोलीस आयुक्तांकडे खासदार संजय पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे. याप्रकरणी खासदार संजय पाटील यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवरच खासदार संजय पाटील संतापले. यावेळी खासदार संजय पाटील यांचा तोल सुटला आणि त्यांनी कॅमेरासमोरच पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रसारित झाला आहे.  
याप्रकरणी जिल्ह्यातील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब ने खा. संजय पाटील यांच्या या कृतीचा जाहीर निषेध केला असून रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनने नागोठणे पोलीस ठाण्यात निवेदन देऊन खासदार संजय पाटील यांच्या विरोधात तक्रार करीत नागोठणे पोलिस ठाण्याचे नव्यानेच पदभार स्वीकारलेले प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद पारखे यांना निवेदन दिले आहे. यावेळी रायगड प्रेस क्लबचे पेण –नागोठणे – सुधागड विभागीय सचिव व नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश पवार, नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य दिनेश ठमके, मंजुळा म्हात्रे आदी पत्रकार उपस्थित होते.  
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना धमकावणे हे केवळ एका व्यक्तीवरील कृत्य नसून पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर  थेट आघात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांनी जनतेच्या वतीने प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य असून त्यासाठी त्यांना धमकावणे, दहशत निर्माण करणे किंवा जीवितास धोका निर्माण करणारी भाषा वापरणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.   उपलब्ध व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे भारतीय न्याय संहिता तसेच इतर संबंधित  कायद्यानुसार दोषींवर तात्काळ गुन्हा नोंदवून निष्पक्ष  व वेगवान चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणीही नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनने निवेदनाच्या माध्यमातून शासनाच्या गृह खात्याकडे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!