E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifदिल्ली NCRनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
आशा शिर्के यांची निवड
आशा शिर्के यांचे सर्वत्र अभिनंदन

पोलिस मित्र संघटनेच्या रोहा तालुका महिला जनसंपर्क प्रमुखपदी आशा शिर्के यांची निवड
आशा शिर्के यांचे सर्वत्र अभिनंदन
नागोठणे | महेश पवार
पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या आदेशानुसार आणि संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांच्या सूचनेनुसार तसेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलभाऊ पाटील व महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा सुजाता चिंता यांच्या सहमतीने नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सौ. आशा रंजन शिर्के यांची पोलिस मित्र संघटनेच्या रोहा तालुका महिला जनसंपर्क प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

आपल्या संघटनेचे महत्त्व ओळखून आपण पोलिस व नागरिकांना मदत कराल, संघटनेची प्रतिमा जनतेत उज्वल कराल आणि संघटनेचा जनाधार मजबूत कराल असे कार्य आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा आशा शिर्के यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.




