E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्य

नागोठण्याजवळील मुरावाडी येथे होळी पंचमी उत्सव उत्साहात

श्री कानिफनाथ भक्तांचा मुरवाडीत जमला मेळा 

नागोठण्याजवळील मुरावाडी येथे होळी पंचमी उत्सव उत्साहात

श्री कानिफनाथ भक्तांचा मुरवाडीत जमला मेळा 

नागोठणे | महेश पवार

नागोठण्याजवळील मुरावाडी येथील ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ तसेच श्री कानिफनाथ उत्सव मंडळ यांच्या वतीने मुरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी मंगळवार दि. १० मार्च रोजी आयोजित केलेला श्री कानिफनाथ महाराजांचा होळी पंचमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मुरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात या होळी पंचमी उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ७ वा. कानिफनाथ संप्रदायातील भक्तगणांच्या हस्ते झालेल्या दुग्धाभिषेकाने या धार्मिक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वा. मुरावाडी ग्रामस्थांकडून होमहवन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वा. कंदुरीचा महानैव मिरवणूक व ध्वजारोहण करण्यात आले. तर सायंकाळी ७ वाजता मुरावाडी ग्रामस्थ कानिफनाथ भक्तांकडून श्री कानिफनाथ महाराजांचे भजन, आरती व ओव्या घेण्यात आल्या.  यामध्ये नागोठणे ग्रामपंचायतीचे कार्यालयीन निरीक्षक असलेले मुरवाडी ग्रामस्थ प्रमोद चोगले यांनी न थांबता गायिलेल्या श्री कानिफनाथ महाराजांच्या ओव्यांनी या धार्मिक सोहळ्यात रंगत आणली. ग्रामस्थ मंडळ, मुरवाडी, के.एम.जी. विभाग व नागोठणे पंचक्रोशीतील भक्तगण व नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

हा धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे गजानन ताडकर, रमेश ताडकर, शिवराम वाघमारे, विनायक ताडकर, प्रवीण ताडकर, काशिनाथ दाभाडे, नयन चोगले, जयेश ताडकर या प्रमुख मंडळींसह ग्रामस्थ चंद्रकांत ताडकर, प्रमोद चोगले, प्रकाश ताडकर, सुरेश ताडकर, राहुल ताडकर, नामदेव ताडकर, जनार्दन चोगले, नवनाथ ग्रामस्थ मंडळ मुरावाडी, मुरावाडीचे इतर ग्रामस्थ, मिरानगर, कोंडगाव, नागोठणे व पाली मधील सर्व नवनाथ भक्त आदींनी मेहनत घेतली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!