E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाढदिवस शुभेच्छा !

अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा

साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांना खा. सुनील तटकरेंनी दिल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

नागोठणे | महेश पवार
पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भाग तसेच  निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या बरडावाडी-देवळी येथील साकव प्रकल्प  समाजसेवी संस्थेचे सचिव अरुण शिवकर हे आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी साजरा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी रायगडचे खासदार, लोकनेते सुनिल तटकरे यांची सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी अरुण शिवकर यांचे मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन अरुण शिवकर यांचे स्वागत करून त्यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके, साकव संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार, हितचिंतक उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!