E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकामगार क्षेत्रटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

विद्यार्थ्यांची पुणे येथे औद्योगिक भेट

औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर 

संगणक व एआयएमएल विभागातील विद्यार्थ्यांची पुणे येथे औद्योगिक भेट

औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील भारतीय एज्युकेशन सोशल चॅरिटेबल ट्रस्ट’ शेठ श्री ओटरमल शेषमल परमार कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग नागोठणे. यांच्या संगणक अभियांत्रिकी व एआयएमएल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रो ॲझुर सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड व राजावी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवेश यादव यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या भेटीच्या  समन्वयक प्रा. विश्रांती पेढवी व प्रा. साहिल शिंदे होते. या उपक्रमास विभाग प्रमुख प्रा. सागर सुरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी पुष्कर शिंदे व एआयएमएल विभागातील विद्यार्थी भाग्येश नाखवा यांनीही औद्योगिक भेटीच्या नियोजन व समन्वयामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
औद्योगिक भेटीदरम्यान एच आर एक्झिक्यूटिव्ह मिस नाझिया पठाण यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, क्लाऊड कंपाऊंटिंग, सर्व्हर मॅनेजमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि डाटा सायन्स या आधुनिक तंत्रज्ञानांची तसेच त्यांचा उद्योगक्षेत्रातील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना टेक्निकल वर्कशॉप, इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज,  इंडस्ट्री स्किल्स आणि आय टी क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत देखील माहिती देण्यात आली.
या भेटीस परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल एच आर मॅनेजर शंकर अर्कस यांचे महाविद्यालयातर्फे आभार मानण्यात आले. भेटीच्या शेवटी द्वितीय वर्ष  एआयएमएल विभागातील विद्यार्थिनी कु. अन्वी सकपाळ हिने मिस नाझिया पठाण व कंपनीच्या प्रतिनिधींचे मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल आभार 
मानले.  ही औद्योगिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्राशी संबंध समजून घेण्यास तसेच भविष्यातील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!