Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

निवृत्ती कुथे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात

पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांना सेवानिवृत्तीच्या अनेकांनी दिल्या शुभेछा !

ना. आदितीताई तटकरे यांचे अंगरक्षक निवृत्ती कुथे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात

पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांना सेवानिवृत्तीच्या अनेकांनी दिल्या शुभेछा !

नागोठणे | महेश पवार

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या सुरक्षा ताफ्यात सुरक्षा अधिकारी म्हणून सुमारे सात वर्षांहून अधिक काळ कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे रायगड पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती परशुराम कुथे यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवार दिनांक ३१ मे रोजी गांधे–चोळे येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आई – वडील शेतकरी असलेल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा रायगड पोलिस दलात भरती होऊन पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचून निवृत्ती झाल्याने निवृत्ती कुथे यांना अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास त्यांच्या पत्नी सौ. हिरावंती निवृत्ती कुथे, ज्येष्ठ सुपुत्र कल्पेश कुथे, सुनबाई समृद्धी कल्पेश कुथे, छोटे सुपुत्र राकेश कुथे, मोठे बंधू केशव कुथे, मधुकर कुथे, मोहन कुथे, छोटे बंधू सोपान कुथे, निवृत्ती कुथे यांचे सोयरे व पेण पंचायत समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य संजय भोईर, माजी सभापती सौ. मनिषा संजय भोईर, ना. आदितीताई तटकरे यांचे माजी स्विय सहाय्यक नंदन बळी, वरप येथील कीर्तनकार ह. भ. प. भगवान कदम, कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील, पोलिस खात्यातील व कॉलेज मधील मित्रपरिवार, नातेवाईक व कुथे परिवारातील सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळालेले निवृत्ती कुथे १४ जुलै, १९९३ रोजी रायगड पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून रुजू झाले होते. सुरुवातीस अलिबाग पोलिस मुख्यालयात काही महिने सेवा बजावल्यानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, महाड, कोलाड अशा अनेक पोलिस ठाण्यात इमानेइतबारे सेवा बजावली होती. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा अंगरक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले.

पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्याचे नेत्रदिपक नियोजन त्यांची दोन्ही मुले कल्पेश व राकेश तसेच मुली समान असलेली त्यांची सुनबाई सौ. समृद्धी कल्पेश कुथे यांच्याकडून करण्यात आले होते. या सोहळ्यात निवृत्ती कुथे व सौ. हिरावंती कुथे यांनी केक कापून सेवानिवृत्तीचा आनंद साजरा केला. या सेवानिवृत्ती सोहळ्यादरम्यान कुथे परिवारातील मुली व सुना यांनी खास बसविण्यात आलेली नृत्ये सादर करून सोहळ्यात रंगत आणली.

सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांचा मोठा मुलगा कल्पेश याने आपल्या बाबांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.  सेवकाळातील झालेल्या बदल्यांतील नवनवीन ठिकाणे, प्रत्येक वेळी बदली झाली की, मिळणारा नवीन मित्रपरिवार, सेवकाळात कुटुंबाला दिलेला कमी वेळ, अगदी त्याच्या विवाहाच्या २५ व्या वाढदिवशीही कार्यक्रमातून बाबांना कर्तव्यावर जावे लागणे या सर्व गोष्टी सांगताना कल्पेश याला भरून आले. आणि आता सेवानिवृत्ती नंतर बाबा आमच्या कुटुंबाला आता जास्तीत जास्त वेळ देणार असल्याने व मला फिरण्याची आवड असल्याने आता पूर्वीची सर्व कसर भरून काढणार असल्याचे यावेळी कल्पेश याने सांगितले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांनी अगदी मोजक्याच शब्दांत आपले मनोगत व्यक्त करून सोहळ्यास आलेल्या सर्वांचे आभार मानले.

 

 

(सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती कुथे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देताना त्यांचे कॉलेज मित्र पत्रकार, ॲड. महेश पवार, संतोष लाड व दगडू शिर्के) 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!