Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनमध्य प्रदेशमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

खारपाडा टोल प्रकरणी कोळी समाजही आक्रमक 

खारपाडा टोल प्रकरणी कोळी समाजही आक्रमक 

जनआक्रोश समितीच्या आंदोलनाला दिला पाठिंबा 
नागोठणे | महेश पवार
अपूर्णावस्थेत असलेल्या  मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा येथील टोल नाका बंद करण्यासाठी जन आक्रोश समितीच्या वतीने गेल्या २५ मे पासून खारपाडा टोल नाका येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ऐतिहासिक व न्याय आंदोलनास अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ महाराष्ट्र यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांनी तशा प्रकारचे पाठिंब्याचे पत्र खारपाडा येथील आंदोलन स्थळी जाऊन जनआक्रोश समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत  कोळी, पुंडलिक ताडकर, श्याम पाटील व तुळशीराम पारंगे हे उपस्थित होते. 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जोपर्यंत शंभर टक्के पूर्ण होऊन जनतेला दर्जेदार रस्ता मिळत नाही तोपर्यंत खारपाडा टोल नाका बंद करण्यात यावा, रायगड जिल्ह्यातील सर्व वाहनांना कायमस्वरूपी टोलमाफी देण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्याही अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ यांनी दिलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत. जनआक्रोश समितीच्या वतीने सुरू असलेल्या या ठिय्या  आंदोलनात आमच्या अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभागी होतील.  तसेच लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत असेही या पत्रात म्हटले आहे. तसेच आंदोलनकर्त्यांवर कोणतीही दडपशाही केल्यास अखिल कोळी समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही सरकारला या पत्रातून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!