Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलधर्मधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

गोविंदा पथकाला शेवटपर्यंत सहकार्य

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा किशोरभाई जैन यांच्या हस्ते शुभारंभ 

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला शेवटपर्यंत सहकार्य हा माझा शब्द : किशोरभाई जैन

गेल्या वर्षी पालीचा गड जिंकणाऱ्या  करणाऱ्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा किशोरभाई जैन यांच्या हस्ते शुभारंभ 
आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा नऊ थर लावण्याचा संकल्प 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नावाने असलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने गेल्या वर्षी प्रचंड यश मिळविल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे आता काही बाहेरील मंडळीही आम्ही गोविंदा पथकाला मदत करतो म्हणून सांगायला लागली. मग आज त्यांनी यायला पाहिजे होते. आता यश मिळाले तर सगळेच मागे येतात. मात्र यश मिळो, ना मिळो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आई जोगेश्वरी माता गोविंदा पथकाला सहकार्य करण्याचा माझा शब्द आहे आणि येथील तरुण वर्गाच्या आणि आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सोबत मी कायम राहणार आहे असे बोलून गेल्यावर्षी पेक्षा यश यावर्षीच्या गोकुळाष्टमीला मिळावे अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि किशोर जैन मित्रमंडळाचे सर्वेसर्वा किशोरभाई जैन यांनी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला दिल्या. 
नागोठण्यात “एक गाव एक गोविंदा” या टॅग लाइन खाली एकत्र आलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या सरावाचा शुभारंभ गोविंदा पथकाचे पुरस्कर्ते किशोरभाई जैन यांच्या हस्ते रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी सायंकाळी नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात उत्साहाने संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांच्यासह भाई टके, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे, संजय पिंपळे, भाविका गिजे, संजय काकडे, अनिल महाडिक, मनोज टके, बिपीन सोष्टे, शिंदे शिवसेना शहरप्रमुख संतोष चितळकर, प्रथमेश काळे, प्रसाद जोगत, शेखर जोगत, ॲड. रमेश जाधव, केतन भोय, आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे अध्यक्ष भरत गिजे, प्रशिक्षक राजेश सुर्वे, स्वप्नील भोसले, संदीप राऊत, प्रविण आमडोसकर, निलेश पिंपळे यांच्यासह गोविंदा पथकाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या वर्षी पाली येथे मानाच्या दोन दहीहंडी फोडून जिंकलेले दोन भव्य चषक व मंडळाची गधा कार्यक्रमस्थळी आकर्षक रित्या सजावट करून त्याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या.  गेल्या वर्षीच्या गोकुळाष्टमीत पाली येथे धुमाकूळ घालणाऱ्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचा बाल गोविंदा कुमारी सान्वी संजय राऊत हिच्यासह गोविंदा पथकातील कमिटी व सर्व गोविंदाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या जुन्या मूर्तींसाठी चांदीचे मुकुट मंडळातर्फे उत्सव समितीकडे देण्यात आले. गेल्या वर्षी आठ थर लावून पाली येथील मानाच्या दोन्ही दहीहंड्या फोडणाऱ्या  आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने यावर्षी नऊ थर लावण्याचा संकल्प केला असून त्यासाठी दररोज रात्री १० ते १२ या वेळेत कसून सराव करण्यात येणार असल्याचे गोविंदा पथकाचे अध्यक्ष भरत गिजे व प्रशिक्षक राजेश सुर्वे  यांनी सांगितले. या सोहळ्याचे सुंदर असे सूत्रसंचालन राहुल ताडकर यांनी केले.
श्री जोगेश्वरी मंदिराच्या प्रांगणात गोकुळ भरल्यासारखे वाटत आहे : किशोरभाई जैन 
निवडणूक हा माझा महत्वाचा विषय नाही. मी कायम दुसऱ्याला खुर्चीवर बसवण्याचे काम केले आहे.  नाईलाज म्हणून मला निवडणूक लढवावी लागली मात्र त्यामध्ये मी पराभूत झालो असलो तरी माझा कुणावर राग रुसवा नाही. काही मंडळी माझ्याकडे येण्यासाठी लाजत होती, मात्र लाजण्याचे कारण नाही. किशोर जैन मित्रमंडळात सर्व पक्ष आहेत. एक गाव, एक गोविंदा आहे तिथे आपण सर्व एक आहोत. असेच आपल्याला कायम एकत्र राहायचे आहे म्हणजे पुढचा काळ आपल्यासाठी असेल. आज संकष्टी चतुर्थीचा योग असल्याने गणपती बाप्पाही आपल्या पाठीशी आहे आणि त्यातच गोविंदाच्या सरावाला पावसानेही हजेरी लावली असल्याने ही एक चांगली सुरुवात असून कृष्णजन्माष्टमी सारखे वातावरण असून नागोठण्यातील सर्व आळींतील तरुण वर्ग मोठ्या संख्येने येथे जमल्याने आज गोकुळ भरल्यासारखे वाटत आहे असे उद्गारही यावेळी किशोरभाई जैन यांनी काढले. तसेच किशोर जैन मित्रमंडळाने छ. शिवाजी महाराज चौकातील नाक्यावर सुरू केलेली दहीहंडीची प्रथा कायम सुरू राहणार असून आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने ही हंडी फोडण्याचा मानही घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने जखमी गोविंदाचा केला सर्व खर्च व काढलाय गोविंदाचा सामूहिक विमा  :-
नागोठण्यातील तरुणांनी गोविंदा पथकाच्या निमित्ताने एकत्र यावे आणि त्यामुळे गावातील तरुणांमधील आपली एकजूट तरुणांची एकी टिकून राहण्यास मदत होईल अशी इच्छा किशोरभाई जैन यांनी तरुणांजवळ व्यक्त केली होती आणि त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत असेही आश्वासनही किशोरभाई जैन यांनी या तरुणांना दिले होते. त्यानुसारच नागोठण्यातील विविध आळीतील तरुणांचे गोविंदा पथक तसेच नागोठण्याजवळील वरवठणे, कडसुरे व निडी येथील काही तरुणांनी एकत्र येत आई जोगेश्वरी गोविंदा पथक स्थापन केले होते. या गोविंदा पथकाचे अध्यक्ष असलेले विहान जिमचे मालक भरत गिजे, प्रशिक्षक राजेश सुर्वे, स्वप्नील भोसले व रवी जासूद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुण व बालगोपालांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे यावर्षी हे चौथे वर्ष असून गोविंदांचा सामूहिक विमा मंडळाने उतरविला आहे. तसेच गेल्यावर्षी हात, पाय, छाती अशाप्रकारे शरीराला विविध प्रकारच्या दुखापती होऊन जखमी झालेल्या सुमारे २५ गोविंदांचा सर्व उपचार खर्च आई जोगेश्वरी गोविंदा मंडळाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!