E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकामगार क्षेत्रमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
कडसुरे येथे वृक्षारोपणातून हरित संदेश
पर्यावरण संवर्धनासाठी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीतील कामगार संघटनांचा पुढाकार

पर्यावरण संवर्धनासाठी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीतील कामगार संघटनांचा पुढाकार
कडसुरे येथे वृक्षारोपणातून हरित संदेश
नागोठणे | महेश पवार
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून अशा लोकोपयोगी उपक्रमांना रिलायन्स व्यवस्थापन नेहमीच सहकार्य करेल, असा विश्वास रिलायन्स नागोठणे कंपनीचे इंडस्ट्रियल रिलेशन हेड श्रीकांत गोडबोले यांनी व्यक्त केला.
भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियन रिलायन्स नागोठणे युनिट, भारतीय कामगार सेना रिलायन्स नागोठणे युनिट व सीएसआर विभाग रिलायन्स नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कडसुरे (ता. रोहा) येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाला रिलायन्स कंपनीचे इंडस्ट्रियल रिलेशन हेड श्रीकांत गोडबोले, भारतीय श्रमिक शक्ती संघाचे कार्याध्यक्ष दिपकभाई रानवडे, वरिष्ठ सल्लागार सुभाष खराडे, केंद्रीय सचिव संजय काकडे, नागोठणे युनिट अध्यक्ष किशोर शिर्के, रिलायन्सचे अधिकारी योगेश तलोड, अमोल सोनावणे, सीएसआर विभागाच्या वरदा कुलकर्णी, नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलिस हे. कॉ. मिलिंद महाडिक, पोलिस शिपाई स्वप्नील भालेराव, बळी पुट्टेवाड, भारतीय श्रमिक शक्ती संघाचे कार्याध्यक्ष पंडित तुपकर, उपाध्यक्ष विनोद गोरे, सरचिटणीस चंद्रकांत अडसुळे, चिटणीस यशवंत डाकी, उपाध्यक्ष मनोज पेढवी, उपाध्यक्ष दिनेश शिर्के, राजेश जवके, कायदेशीर सल्लागार ॲड. महेश पवार, मारुती दांडेकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस अशोक भोय, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निलमताई विनोद शिंदे, कडसुरे गावातील ज्येष्ठ नागरिक रमेश शिर्के, कडसुरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आशाताई शिर्के, रविंद्र शिर्के, रघुनाथ शिर्के, अनंत शिर्के, दीपक शिर्के, विठोबा शिर्के, भास्कर तुपकर, कडसुरे शाळेचे मुख्याध्यापक भास्कर लेंडी, शिक्षिका निर्मिती कोळी, अंगणवाडी सेविका स्वप्नाली शिर्के, मदतनीस सोनाली शिंदे, वैशाली नमन शिर्के, जयश्री गवंडकर, अस्मिता शिर्के आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत गोडबोले म्हणाले की, सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात वृक्षारोपण आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. कंपनी परिसरातील गावांमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियन व भारतीय कामगार सेना रिलायन्स युनिटच्या पदाधिकारी आणि सदस्यांचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमात भारतीय श्रमिक शक्ती संघ युनियन रिलायन्स नागोठणे युनिटचे अध्यक्ष किशोर शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे या अभंगातील संदेशाचे महत्त्व विशद केले. तसेच, पाणी वाचवा, जीवन वाचवा हा आपल्या पूर्वजांचा संदेश पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय श्रमिक शक्ती संघाचे सरचिटणीस चंद्रकांत अडसूळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संघटनेचे केंद्रीय सचिव संजय काकडे यांनी मानले.




