E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधर्मधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
पिठोरी उत्सव उत्साहात
पिठोरी मातेच्या पूजनाने नागोठण्यात भक्तिमय वातावरण

नागोठणे शहर व ग्रामीण भागात पारंपरिक पिठोरी उत्सव उत्साहात
पिठोरी मातेच्या पूजनाने नागोठण्यात भक्तिमय वातावरण
नागोठणे | महेश पवार
संततीचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी श्रद्धेने साजरी केली जाणारी पिठोरी आमावस्या नागोठणे शहर व विभागात भक्तिमय आणि आनंदी वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी पिठोरी मातेची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. महिलांसह ग्रामस्थांनी भक्तिभावाने पिठोरी मातेचे दर्शन घेतले.

पिठोरी अमावस्येला हिंदू धर्मपरंपरेत विशेष महत्त्व असून, संततीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी पिठोरी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही पूजा श्रद्धा, संस्कृती आणि कौटुंबिक परंपरेचे जतन करणारी मानली जाते.
याच पारंपरिक धार्मिक भावनेतून नागोठणे शहर व ग्रामीण विभागात अनेक नागरिकांनी आपल्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी केली. अनेक कुटुंबीयांनी पिठोरी अमावस्या हा सण भक्तिमय वातावरणात साजरा केला. पिठोरी असलेल्या ठिकाणी नातेवाईक मित्रपरिवार यांनी भेट देऊन पिठोरी मातेचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांनी पूजा-अर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला.

नागोठणे शहर तसेच ग्रामीण परिसरातील अनेक मित्रपरिवार व आप्तेष्ट पिठोरी असलेल्या ठिकाणी आवर्जून भेट देत पिठोरी मातेचे दर्शन घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे हा उत्सव धार्मिक श्रद्धेसोबतच आपुलकी, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव म्हणूनही अनुभवायला मिळतो.





