E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
किशोरशेठ जैन यांनी अनेक बाबतीत वेधले लक्ष
किशोरशेठ जैन यांची धडपड पाहता नागोठणेकरांवर आली पाश्चातपाची वेळ

आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या नागोठण्यातील पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात किशोरशेठ जैन यांनी अनेक बाबतीत वेधले लक्ष
किशोरशेठ जैन यांची धडपड पाहता नागोठणेकरांवर आली पाश्चातपाची वेळ
नागोठणे | महेश पवार
अंबा नदीला नागोठणे शहर व परिसरात तीन वेळा आलेल्या पुरामुळे झालेल्या व्यापारी, नागरिक व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेवर दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले आणि राज्याच्या पावसाळी अधिवेशनात रायगडसह कोकणातील विविध प्रश्नांवर आवाज उठविणारे दमदार आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी नागोठणे शहर, वाकण व परिसराचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोरशेठ जैन यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे पूरग्रस्त नागोठण्याच्या व परिसराच्या अनेक बाबतीत लक्ष वेधून पूरग्रस्तांच्या समस्यांना वाचा फोडली. नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापारी, विभागातील शेतकरी व नागरिकांच्या बाबतीत किशोरशेठ जैन यांची तळमळ व धडपड पाहता नागोठणेकरांनी कुठेतरी चुकीचा निर्णय घेतला असल्याची भावना व पश्चाताप करण्याची वेळ आल्याची भावना यावेळी अनेक उपस्थित व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली.

आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे पूरग्रस्त नागोठणे शहर व वाकण परिसराची पाहणी करण्यासाठी गुरुवारी(दि.९) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, किशोरशेठ जैन, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या पूनम काळे, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, उपाध्यक्ष अनिल काळे, दिलीप शहासने, बिकानेर मिठाई व्यापारी प्रतिनिधी रतन देवासी, अखलाक पानसरे, अतुल काळे, जोहेब कुरेशी, प्रथमेश काळे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, बिपीन सोष्टे, मंगेश तेरडे, शैलेश रावकर, सिराज पानसरे, रुचिर मोरे, मोहन नागोठणेकर, विजय शहासने, ॲड. श्रीकांत रावकर, मनोज टके, ॲड. रमेश जाधव, गुड्डू मोदी, समीर भिकन, रोशन पारंगे, अंकुश ताडकर, केतन भोय, आलोक काळे, बंटी चोपडा आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकातून सुरू केलेल्या पूरग्रस्त नागोठण्याच्या पाहणी दौऱ्यात बाजारपेठ, कोळीवाडा, मोहल्ला परिसर खुमाचा नाका मार्गे एस टी स्थानकासमोरील रस्त्याची पाहणी केली. यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे यांनी व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दुकान साफसफाई करतांना रस्त्यावर सामान काढून ठेवताना नव्यानेच रुजू झालेले प्रभारी पोलिस अधिकारी रविंद्र पारखे हे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याच्या कारणास्तव दमदाटी करत असल्याची माहिती छ. शिवाजी चौकातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम व जनरल स्टोअरचे एक व्यापारी कुणाल तेरडे यांनी आमदार तटकरे यांनी दिली आणि दुकानांची साफसफाई करतांना एक दिवस वाहतूक बंद करण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी नागोठण्यातील व्यापारी नेहमी सहकार्याची भूमिका पार पाडत असल्याने अशा प्रसंगी आपणही त्यांना सहकार्य करण्याची सूचना आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पोलिसांना केली.

त्यानंतर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पूरग्रस्त नागोठण्याची पाहणी करून वाकण नाक्याकडे पाहणी करण्यास जाण्यापूर्वी त्यांनी येथील अग्रवाल इलेक्ट्रॉनिक दुकानासमोर खूप वेळ उभे राहून कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. यादरम्यान आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पाटबंधारे खाते, महसूल खाते, वीज वितरण कंपनी, पोलिस खाते आदी खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरशेठ जैन यांनी महाडच्या सावित्री नदीप्रमाणे अंबा नदीमधील गाळ काढणे, सर्व पूरग्रस्तांचे रीतसर पंचाने करणे, व्यापाऱ्यांना विमा कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासातून सुटका करणे तसेच रिलायन्स कंपनीच्या हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी काही तांत्रिक बाबतीत रिलायन्स कंपनी प्रशासनाने सहकार्य करण्यासंदर्भात आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे लक्ष वेधले. दरम्यान आमदार अनिकेतभाई तटकरे वाकण नाक्याकडे रवाना झाल्यानंतर किशोरशेठ जैन यांनी घरी जाणे पसंद न करता ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांना सोबत घेऊन छ शिवाजी महाराज चौक, नागोठणे बाजारपेठ, कोळीवाडा परिसरात पुन्हा फेरफटका मारून पुरामुळे झालेली घाण व त्यामुळे पसरलेली दुर्गंधी लक्षात घेऊन तत्काळ रिलायन्स व सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित परिसराची साफसफाई करण्यासाठी अग्निशामक दलाची मागणी केली. त्यानुसार दोन्ही कंपनी प्रशासनाने शुक्रवारी (दि१०) सकाळी परिसराची स्वच्छता करण्यासाठी येण्याची तयारी दाखविली.

रोहा तहसीलदारांचा आडमुठेपणा :
पूरग्रस्त नागोठणे व परिसरातील नागरिकांच्या समस्या सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते किशोरशेठ जैन यांनी बुधवारी (दि.८) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना व्हॉट्स ॲप कॉल केला असता, तहसीलदारांनी नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. उलट तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी किशोरशेठ जैन यांना व्हॉट्स ॲप वर मेसेज करून, शेठ, काय काढलं रात्रीचे काम… मला रेग्युलर कॉल करत जा.. असा प्रति मेसेज केला. त्यावर संतप्त झालेल्या किशोरशेठ जैन यांनी “मला काही काम नाही, म्हणून कॉल करतोय.. असे प्रतिउत्तर तहसीलदारांना केले. यावरून रोहा तहसीलदार डॉ किशोर देशमुख यांना पूरग्रस्त नागोठण्याचे किती गांभीर्य होते ते दिसून येत असल्याने किशोरशेठ जैन यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शासकीय यंत्रणेचा उदासीनपणा झाला उघड :
नागोठण्यात १९८९ चा महापूर, त्यानंतर २००५ मध्ये आलेल्या पुरात तसेच प्रत्येक वर्षी येणाऱ्या छोट्या छोट्या पुराच्यावेळी शासकीय यंत्रणा व त्यांचा आपत्कालीन यंत्रणा कक्ष तत्पर असल्याचे दिसून आले होते. मात्र यावेळी पुराच्या बाबतीत राज्याच्या नकाशावर अतिशय संवेदनशील असलेल्या नागोठण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आँचल दलाल, महसूल खात्याचे रोहा तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना कोणतेच गांभीर्य नसल्याचे यावेळी प्रथमच दिसून आले. महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी असलेले तहसीलदार तर नागोठण्यात पूरग्रस्त ठिकाणी पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष न येता आपली यंत्रणा येथील महामार्गावरील हॉटेल रुची व हॉटेल कामत या दोन हॉटेल मध्ये बसून चालवित असल्याची माहिती नागरिकांतून उपलब्ध झाल्याने किशोरशेठ जैन यांनी संताप व्यक्त करून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची येथून उचलबांगडी करावी अशी मागणी केली आहे.




