Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

निर्मला ताडकर यांचे वयोवृद्धत्वाने निधन 

निर्मला ताडकर यांचे वयोवृद्धत्वाने निधन 

नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील वेलशेत गावातील रहिवासी श्रीमती निर्मला तुळशीराम ताडकर (वय ८२) यांचे सोमवार दिनांक ८ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळामुळे राहत्या घरी निधन झाले. प्रसिद्ध शाहीर, निवेदक, लेखक, कवी पुंडलिकभाई ताडकर व पहाडी आवाजाचे गायक अशी ओळख असलेले शीघ्र कवी संतोष (एस. टी) ताडकर यांच्या त्या मातोश्री आहेत. दिवंगत निर्मला ताडकर यांच्या पार्थिवावर वेलशेत येथील वैकुंठ स्मशान भूमीत सोमवारीच दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यावेळी ताडकर कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे, नागोठणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच वेलशेत येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
दिवंगत निर्मला ताडकर यांच्या पश्चात दोन विवाहित मुले पुंडलिक व संतोष, दोन मुली श्रीमती प्रमिला प्रदीप पारंगे व वसुधा तुळशीराम ताडकर, सुना, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत निर्मला ताडकर यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण ताडकर परिवारावर शोककळा पसरली आहे.
दिवंगत निर्मला ताडकर यांची परिस्थिती गरीब असली तरी त्यांनी काबाड कष्ट करून स्वाभिमानाने आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांना पारंपरिक गाणी बोलण्याची आवड होती. तीच कला त्यांचे दोन्ही मुलांना उपजत मिळाली असून ती कला आज ते जोपासत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!