E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्स्फूर्त स्वागत 

छ. शिवाजी महाराज चौकातही भव्य स्वागत 

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्स्फूर्त स्वागत 

छ. शिवाजी महाराज चौकातही भव्य स्वागत 
नागोठणे | महेश पवार
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिरढोण (ता. पनवेल) येथील क्रांतीज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या क्रांतीज्योतीचे नागोठण्यातील हायवे नाका येथे मंगळवारी(दि.१७) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी या क्रांतीज्योतीचे नागोठणेकरांकडून भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिव स्मारकाजवळ क्रांतीज्योतीचे आगमन होताच येथेही क्रांतीज्योतीचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही क्रांतीज्योत शिरढोणकडे रवाना झाली.
क्रांतीज्योतीच्या या स्वागत समारंभास नागोठणे हायवे नाका व छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पो. ह. विनोद पाटील, पवन पोलसानी, सुधाकर जवके, विजय धामणे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, कार्याध्यक्ष सचिनशेठ कळसकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे,  ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अतुल काळे, विद्यमान सदस्य सचिन ठोंबरे, संदीप राऊत, नितीन राऊत, राजेश पिंपळे, चेतन कामथे, संतोष जोशी, रुपेश रटाटे, संजय नांगरे, मुकेश दोशी, कुलदीप शहासने, शिवराज पोलसानी, डॉ. सौरभ पाटील, हरेश शिर्के, मोहित अग्रवाल, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्रांतीज्योती चे हे ४० वे वर्ष असून सुधागड तालुक्यातील विळे येथील कालकाई माता मंदिरातून ज्योत प्रज्वलित करून या क्रांतीज्योतीची सुरुवात करण्यात आली होती. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या या क्रांतीज्योतीचे नागोठण्यातील स्वागताचे आयोजन पवन पोलसानी यांच्याकडून व मित्रमंडळी कडून करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!