E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठणे आंगर आळीत शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन 

भव्य पालखी मिरवणूक ठरणार आकर्षण 

नागोठणे आंगर आळीत शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन 

भव्य पालखी मिरवणूक ठरणार आकर्षण
नागोठणे | महेश पवार 
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागोठण्यातील आंगर आळी येथील सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकळ हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छ. शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या  निमित्ताने भव्य आयोजन करण्यात आले आहे. सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे हे ५ वे वर्ष आहे.
छ. शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने गुरुवार बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. गुरुवारी (दि.१९) सकाळी ९ वाजता नागोठण्यात शिवज्योतीचे आगमन होणार आहे. त्यानंतर आंगर आळी येथील शिवस्मारकाजवळ शिवज्योत नेण्यात येईल.  त्याठिकाणी सकाळी ९.३० वाजता शिवज्योतीचे अभिषेक पूजन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान शिवज्योत प्रदक्षिणा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता रोहा येथील इतिहास अभ्यासक सुखद राणे यांचे शिव व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री ८.३० वाजल्यापासून कै. भरतशेठ मांगीलाल परमार यांच्या स्मरणार्थ महाप्रसाचे आयोजन करण्यात आले आहे. आंगर आळी येथील हा शिवजयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मंडळाचे कार्याध्यक्ष संजय पिंपळे, अध्यक्ष चेतन कामथे, उपाध्यक्ष पंकज कामथे, सचिव अल्विन नाकते, सहसचिव किरण पवार, खजिनदार कैलास गोरे, सह खजिनदार संदीप शिर्के या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य, आंगर आळी ग्रामस्थ व महिला मंडळ मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!