E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकराओके गायन स्पर्धामनोरंजनमहाराष्ट्रयुवालोकल न्यूज़
कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओ मध्ये ३१ मे ला झाली होती स्पर्धा

कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओ मध्ये ३१ मे ला झाली होती स्पर्धा
नागोठणे | महेश पवार
नागोठणे शहर व परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपास आलेल्या नागोठणे बाजार पेठेतील प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओ
मध्ये दि. ३१ मे रोजी उत्साहात पार पडलेल्या कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. ९ जून रोजी पीएनपी नाट्यगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कराओके स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अलिबागच्या विद्यमान उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, राजाभाऊ ठाकूर साहेब, सुरेंद्र म्हात्रे, रेवदंडा ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाबू मोरे, के. डी. पाटील, विक्रांत वार्डे, निवेदक यशवंत हारेर, महेश दळवी, मराठी इंडियन आयडॉलचे सेलिब्रिटी गायक सागर म्हात्रे, सुप्रसिद्ध गायक एकच राजा इथे जन्मला फेम रोहित पाटील, सुप्रसिद्ध गायक योगेशकुमारजी तसेच ‘गौरव महाराष्ट्राचा’ म्हणून ओळखले जाणारे स्वरवैभव थोरवे, प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओच्या सर्वेसर्वा प्रतीक्षा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अनेक मान्यवर आणि नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमुळे समारंभाची शोभा अधिकच वाढली.

करावोके गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक प्रज्ञा सावंत, द्वितीय क्रमांक सागर ठोंबरे, तृतीय क्रमांक प्रसाद उलांडे, चतुर्थ क्रमांक सुजी मॅथ्यू, पाचवा क्रमांक महेश पाटील यांना गौरविण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हंसिका पाटील, वैभव पोटले, आयेशा सय्यद, प्रथमेश गायकवाड यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संगीतप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. नागोठण्यात प्रथमच झालेल्या या कराओके स्पर्धेसाठी प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओच्या संचालिका प्रतीक्षा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडिओ मधील चित्रकला प्रशिक्षक प्रफुल्ल नागोठणेकर, नृत्य प्रशिक्षक शैलेश साळुंखे, संगीत प्रशिक्षक कौस्तुभ दिवेकर, जिम ट्रेनर गणेश तेलंगे, पेंटिंग कला प्रशिक्षक सोनिया धामणे, मेकअप प्रशिक्षक जैनीशा जैन, मेहंदी प्रशिक्षक रुचिका जैन, कॅलिथेनिक्स प्रशिक्षक प्रांजल पांडे आदींनी सहकार्य केले.



