Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

प्रा. अमित क्षीरसागर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयात संगणक व एआय-अँड-एमएल विभागासाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

प्रा. अमित क्षीरसागर यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 
नागोठणे | महेश पवार
भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML) विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “Career Guidance Session on Emerging Programming Languages & IT Career Opportunities” या विषयावर विशेष अतिथी प्रा. अमित क्षीरसागर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या संधी, उद्योग क्षेत्रात सर्वाधिक मागणी असलेल्या प्रोग्रामिंग भाषा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), तसेच करिअर घडविण्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. अशा कौशल्यांची उद्योगक्षेत्रात वाढती मागणी असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी सातत्याने तयारी ठेवावी, यावर विशेष भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान विविध शंका विचारून करिअर नियोजन, इंटर्नशिप, प्रकल्प, प्रोग्रामिंग भाषा निवड आणि उद्योग क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन घेतले. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरले.
महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ.  प्रवेश यादव, कॉम्प्युटर विभागप्रमुख सागर सुरेकर, एआय-अँड-एमएल विभागप्रमुख स्पृहा तांडेल, प्राध्यापक तसेच कॉम्प्युटर व एआय-अँड-एमएल विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन संबंधित विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!