Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवालायन्स क्लब उपक्रमलोकल न्यूज़

डोळ्यांचे चांगले उपचार लायन्स क्लब करीत आहे

नेत्रचिकित्सा शिबिरास ६६ रुग्णांची तपासणी : ४० रुग्णांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

डोळ्यांचे चांगले उपचार करण्याचे काम नागोठणे लायन्स क्लब करीत आहे : किशोरभाई जैन

नेत्रचिकित्सा शिबिरास ६६ रुग्णांची तपासणी : ४० रुग्णांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे लायन्स क्लब जिथे नेत्रचिकित्सा शिबिर घेते ते स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानची जागा माझ्या सहकार्यामुळे त्यांना वापरायला मिळते याचा लायन्स क्लब कडून नेहमी उल्लेख होतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे तत्व होते. मात्र याठिकाणी नागोठणे लायन्स क्लब १०० टक्के समाजकारण करीत आहे. त्यामुळे या नागोठणे शहर व परिसरात डोळ्यांच्या उपचारासाठी ही एक हक्काची सामाजिक संस्था असून डोळ्यांचे चांगले उपचार करण्याचे काम नागोठणे लायन्स क्लब करीत आहे असे कौतुकास्पद उद्गार लायन्स सदस्य व राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांनी काढले. 
गवळ आळी, नागोठणे येथील रहिवासी कै. अंजली गणपत जोगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रसाद जोगत व शेखर जोगत यांच्या सौजन्याने तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चोंढी – अलिबाग यांच्या संयुक्त विद्यामाने नागोठणे लायन्स क्लब कडून या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.५) करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ६६  नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या ४० रुग्णांवर लायन्स हेल्थ फाउंडेशन व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चोंढी – अलिबाग येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  
या शिबिराला किशोरभाई जैन यांच्यासह नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एम जे एफ लायन यशवंत चित्रे, एम जे एफ लायन विवेक सुभेकर, सचिव डॉ. अनिल गीते, नागोठणे लायन्स क्लबचे सर्व लायन सदस्य सखाराम ताडकर, दौलत मोदी,  जयराम पवार,  विजय शहासने, दीपक गायकवाड, अनुराधा शहासने, दीपक लोणारी, रतन हेंडे, विद्या म्हात्रे, प्रसाद जोगत, शेखर जोगत, रवी वाजे, चोंढी – अलिबाग येथील लायन्स हेल्थ फाउंडेशन व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉ. शुभदा कुरतडकर व त्यांची टीम आदींसह नागोठणे शहर व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. शुभदा कुरतडकर यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सुभेकर यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!