Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

पल्स पोलिओ लसीकरण

३ हजार १०४  बालकांना पल्स पोलिओचा डोस

नागोठण्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

३ हजार १०४  बालकांना पल्स पोलिओचा डोस

नागोठणे : महेश पवार
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (दि. २८) पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.  यामध्ये नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सहा उपकेंद्रातील एकूण ६१ बुथवर ० ते ५ वयोगटातील अपेक्षित ३ हजार २७८ लाभार्थ्यांपैकी सुमारे ३ हजार १०४  बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खुप कालावधीनंतर शासनाकडून राबविण्यात आलेल्या या पल्स पोलिओ मोहिमेत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राने रविवारी जवळपास ९५ टक्के मोहीम पूर्ण केली आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बुथवर आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता नाईक यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस देवून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय नागोठणे एस.टी. स्थानक, नागोठणे रेल्वे स्थानक, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व ५८ गावे व ४५ आदिवासी वाड्यांमधील प्राथमिक शाळा, अंगणवाडी तसेच शहरातील विविध भागांत पल्स पोलिओ लसीकरणासाठी बुथ उभारण्यात आले होते.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या पल्स पोलिओ मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डाॅ. अस्मिता नाईक, महिला आरोग्य  सहायक फुलावंती पवार, आरोग्य सहायक भारत मारकड,  राजेंद्र पवार, सर्व आरोग्य सेविका, आरोग्य सेविका व गट प्रवर्तक, आंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासह एकूण १२९ कर्मचारी सहभागी झाले होते. रविवारच्या या मोहिमे नंतर दिनांक २९ जूनपासून एकूण ९७ टीमकडून तीन दिवस १३ हजार, २३० घरांना भेटी देऊन या घर भेटींद्वारे पोलिओ डोस न घेतलेली मुले शोधून त्यांना पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे डाॅ. अस्मिता नाईक यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!