E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शिक्षण

सीबीएसई दहावीच्या परिक्षेत जिंदाल माउंट लिटेरा झी स्कुलचे १०० टक्के यश 

कु. चाहित्य गोंदणे ९६.६० टक्के गुणांसह प्रथम

सीबीएसई दहावीच्या परिक्षेत जिंदाल माउंट लिटेरा झी स्कुलचे १०० टक्के यश 

कु. चाहित्य गोंदणे ९६.६० टक्के गुणांसह प्रथम
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदल माउंट लिटेरा झी स्कुलचा सीबीएसई बोर्ड परिक्षेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.  यामध्ये जिंदाल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत पुन्हा एकदा आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. तसेच जिंदाल मााऊंट लिटेरा झी स्कूलने आपली १०० टक्के यशाची परंपरा यावर्षीही अबाधित ठेवली आहे. 
जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूल मधील दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व ७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये कु. चाहित्य गोंदणे हा विद्यार्थी ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. कु. गौरव राजपूत व कुमारी चेरी राठोड हे विद्यार्थी प्रत्येकी ९६.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर कु. आर्यन सोनवणे हा विद्यार्थी ९६ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. याशिवाय कुमारी शांभवी गुप्ता व कु. कार्तिक जोशी ९५.८० टक्के गुण मिळवून चतुर्थ व कुमारी मृदुला वाचकवडे हिने ९५.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला आहे.
जिंदाल माउंट लिटेरा झी स्कूल मधील २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक तर २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक, १६ विद्यार्थ्यांनी ७० टक्के पेक्षा अधिक गुण, ११ विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण तर ३ विद्यार्थ्यांनी ५० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
जिंदाल मााऊंट लिटेरा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्वागतीका साहू, परीक्षा प्रमुख सोमा बॅनर्जी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व शिक्षकवृदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन विद्यार्थ्यांना  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!