E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
भाएसो इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा १०० टक्के निकाल
चेतन मांगे यांनी ८५.०९ टक्के गुण मिळवून प्रथम

भाएसोच्या इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा १०० टक्के निकाल
चेतन मांगे यांनी ८५.०९ टक्के गुण मिळवून प्रथम
नागोठणे : महेश पवार
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (MSBTE, Mumbai) या कोर्सचा या वर्षीचा सन २०२५-२६ चा निकाल १००% लागला आहे. यामध्ये चेतन मांगे यांनी ८५.०९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच अमन पोरवाल आणि कुमारी. चंद्रकला राजपूत यांनी प्रत्येकी ८४.५५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ओंकार गोळे यांनी ८४.४५ टक्के मिळवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोरशेठ जैन, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन, कोर्स कॉ-ऑर्डिनेटर सतीश सुर्वे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
भारतीय एज्युकेशन सोसायटी मध्ये ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी हा कोर्स सन २००६-०७ पासून सुरू आहे. या कोर्सच्या निकालाची परंपरा हा कोर्स सुरू झाल्यापासून खूप चांगली आहे. या कोर्स मध्ये अनेक कंपनीतील चांगल्या पदावर काम करणाऱ्या कामगारांपासुन ते उच्च पदावर मॅनेजर पासूनचे पदाधिकारी प्रवेश घेत असतात. या कोर्समुळे त्यांना देशात व परदेशात उच्च पदावर भरघोस पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. स्थानिकांसह रोहा, सुधागड, पेण, अलिबाग या जवळच्या तालुक्यांसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा व कामगारांचा या कोर्समुळे शैक्षणिक व आर्थिक विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी देखील संस्थेचे अध्यक्ष किशोरशेठ जैन यांचे आभार मानले आहेत.



