E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

तीन दुकान गाळ्यांत चोरी 

सिमेंटचे पत्रे फोडून भुरट्या चोरट्यांचा दुकानात प्रवेश

नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी संकुलातील तीन दुकान गाळ्यांत चोरी

सिमेंटचे पत्रे फोडून भुरट्या चोरट्यांचा दुकानात प्रवेश
तिन्ही दुकान गाळ्यांतून रोकडसह सुमारे १५ ते २० हजारांचा मुद्देमाल लंपास
नागोठणे : महेश पवार
नागोठणे विभागातील शेतकऱ्यांची आणि नागोठणे विभागातील सर्वात मोठी सहकारी संस्था असलेल्या नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी या संस्थेने आपल्या स्वतःच्या जागेत उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोड लगत बांधलेल्या व्यावसायिक दुकान गाळ्यांत शुक्रवारी (२६) रात्री चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी तीन  दुकान गाळ्यांच्या वरील छताचा सिमेंटचा पत्रा फोडून आतमध्ये प्रवेश करून ही चोरी केली आहे. या चोरीत चोरट्यांच्या हाताला फार काही लागले नसले तरी महामार्गालगत घडलेल्या या चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गात व नागरिकांत घबराट पसरली आहे.
नागोठणे विभाग सहकारी भातगिरीच्या या व्यावसायिक गाळ्यातील एकविरा स्टोअर नावाने असलेल्या पहिल्या गाळ्यात प्रवेश करून दुकानाच्या  गल्ल्यातील ४०० ते ५०० रुपयांची रोकड व शीतपेयांच्या बाटल्या तसेच सिगारेटची पाकिटे लंपास केली आहेत. या दुकान गाळ्याळगतच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या ऑईलवाला डॉट कॉम या दुकान गळ्यातील महागडे ऑईल तसेच ऑईल वर कंपनीकडून मोफत स्कीम मध्ये देण्यात येणाऱ्या वस्तू लंपास केल्या आहेत. तसेच भातगिरणीच्या या व्यवसायिक गाळ्यांतील शेवटी असलेले एक छोटे हॉटेलही चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील सुमारे २ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. तिन्ही दुकानातील मिळून सुमारे १५ ते २० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
या तिन्ही दुकान गाळ्यांवरील छताचे फोडलेले सिमेंटचे पत्रे पाहता फोडलेला पत्रा हा लहान आकारात फोडून प्रवेश केल्याचे दिसून येत असून  चोरीचे हे काम एकट्याचे नसून छोटी शरीरयष्टी असलेल्या तरुण मुलाने छोट्या आकारात पत्रा फोडून  त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत ही दुकानदोडी केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान सपोनि रविंद्र पारखे यांनी नागोठणे पोलिस ठाण्याचा प्रभारी कार्यभार घेऊन दोन – तीन दिवस होत नाही तोच ही चोरीची घटना घडल्याने या भुरट्या चोरट्यांचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याचे आवाहन नागोठणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!