E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक
मनसेकडून मोफत चहा-नाश्ता
रोहा तालुका मनसेचा गेली तीन वर्ष सलग उपक्रम

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकण वासियांसाठी मनसेकडून मोफत चहा-नाश्ता
रोहा तालुका मनसेचा गेली तीन वर्षे सलग उपक्रम
नागोठणे | महेश पवार
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकण वासियांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा तालुक्याच्या वतीने मोफत चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रोहा तालुका मनसे कडून राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून, काही लोक केवळ निवडणुकीच्या वातावरणात असे स्टॉल लावतात परंतु मनसे ही जनतेच्या मनात असून कोणत्याही निवडणुकीच्या स्वार्था शिवाय गेले तीन वर्षे सातत्याने हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि यापुढेही राबवत राहू असे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळील चिकणी गावाच्या हद्दीत महाडकडे जाणाऱ्या मार्गीकेलगत मंडप उभारून शनिवार, १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ही मोफत चहा, नाश्ता व पाण्याची सेवा सुरू ठेवण्यात आली होती. कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.

वाहतूक कोंडी आणि लांबच्या प्रवासामुळे थकलेल्या गणेशभक्तांना प्रवासादरम्यान विसावा मिळावा, ऊर्जा मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेऊन ही सेवा रात्रभर अविरतपणे सुरू ठेवण्यात आली होती.
मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे, नागोठणे शहराध्यक्ष प्रभाकर तांडेल, रोहा तालुका महिला सेना अध्यक्षा दीपेश्री घासे आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

या सामाजिक उपक्रमासाठी सहकार्य करणारे मनसे नेते अविनाशदादा जाधव, जिल्हाध्यक्ष राज पार्टे, मध्य जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रे, मराठी उद्योजक किरण घोडेकर, राजश्री घोडेकर आणि दीपक सोनवणे यांचे मनसे रोहा तालुक्याच्या वतीने आभार मानण्यात आले.




