E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
वैद्यकीय महाविद्यालयात रॅली

आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात रॅली
नागोठणे | महेश पवार
११ व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी वेलशेत येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलातील श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, वेलशेत-रोहा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमांची सुरुवात वैद्या रेखा पांडें यांच्या मार्गदर्शनाखालील आरोग्य रॅलीने करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आयुर्वेद प्रसारांच्या उद् घोषणांनी परिसर भारावून टाकला. यानंतर द्रव्यगुण विभागांर्तगत वैद्य अक्षरा चव्हाण यांच्या देखरेखी खाली वृक्षारोपण करण्यात आले.
सोबत विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी आणि आरोग्य संदेश फलकांद्वारे निमंत्रित वैद्य आणि वक्त्यांचे स्वागत केले.

दुपारी २ वाजता आरोग्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोरजी जैन, आयुर्वेद व्यासपीठ, रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष वैद्य निशिगंध आठवले, सदस्य वैद्य अमर पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य अर्चिस रविंद्र पाटील यांनी सुमधुर वाणी आणि तुलसीची रोपे यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून वैद्या आदिती भिडे, सहकार्यवाह, आयुर्वेद व्यासपीठ यांनी आपल्या सुगम आणि सुविद्य व्याख्यानाने सर्वांचे बुद्धिवर्धन केले. वैद्या वर्षा माळी यांनी संहिता विभागार्तंगत या विषयावर निबंध स्पर्धा आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यास वाव दिला.




