E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

कु. निष्ठा म्हात्रे प्रथम 

कु. निष्ठा म्हात्रे डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग परीक्षेत प्रथम 

नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत एच ओ सी पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आणि उरण येथील रहिवासी असलेली कुमारी निष्ठा जितेश म्हात्रे हिने डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग परीक्षेत ९४.२४ टक्के गुणांसह कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. कुमारी निष्ठा हिला ८५० पैकी ८०१ गुण मिळाले आहेत. 
उरणचे रहिवासी आणि उरण शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व रायगड जिल्हा पर्यावरण विभागाचे सरचिटणीस जितेश म्हात्रे यांची ती मुलगी आहे. तर सिमेन्स (कळवा) कंपनीतून सेवानिवृत्त झालेले प्रमोद मुकादम, राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, सामाजिक कार्यकर्ते हरेश टके यांची कु. निष्ठा ही नात आहे. 
कुमारी निष्ठा जितेश म्हात्रे ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असून तिने उरण मधील नामांकित शाळा असलेल्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधून दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळविले आहेत. कुमारी निष्ठा हिच्या यशामागे तिची आई पुनम आणि वडील जितेश यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. कुमारी निष्ठा म्हात्रे हिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत असून तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!