E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

हृदय तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद

शिबिरात ६७ नागरिकांची हृदय तपासणी

शिहू फाटा येथील हृदय तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद

शिबिरात ६७ नागरिकांची हृदय तपासणी
नागोठणे | महेश पवार
शिहू व नागोठणे येथे कार्यरत असलेले डॉक्टर पुरुषोत्तम भोईर यांचे वडील दामोदर हरी भोईर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. भोईर क्लिनिक आणि नवी मुंबई येथील शुश्रुषा हार्ट केअर सेंटर स्पेशालिटी हॉस्पिटल
यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी(दि.१) शिहू फाटा येथे संपन्न झालेल्या हृदय तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 
या शिबिराचे उद्घाटन डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनील पाटील, डॉ. सुधीर पाटील, डॉ. अभिषेक शहासने,  डॉ. कविता कदम, डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. प्रिया भोईर, दामोदर भोईर, लक्ष्मण खाडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तर शुश्रुषा हार्ट केअर सेंटर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीम मधील डॉ. कविता कदम, संजय गडकर जयेश म्हात्रे, मनीषा वसावे, दर्शना मावशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात एकूण ६७ नागरिकांची हृदय तपासणी करण्यात आली.  यापैकी २५ रुग्णांना २ डी ईको, स्ट्रेस टेस्ट साठी सुश्रुषा हार्ट केअर सेंटर, हॉस्पिटल, नवी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.  हे शिबिर यशस्वी रित्या संपन्न होण्यासाठी नागोठण्यातील  डॉ.  निखिल गरुडे, डॉ. साधना झोलगे,  डॉ. अंकित भोईर, डॉ. अश्विनी कुथे,  लक्ष्मण खाडे,  दीपक पाटील अंशत: भुरे, दिलीप भोईर, दिनेश ठाकूर, प्रदीप केणी, दत्ताराम घासे, अनामिका लोहार, डॉ. योगिनी घायले,  चेतन पोवळे, सुहग भोईर, विशाल दिवेकर, मोहन चोगले,  जीवन भोईर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.  तसेच या शिबिरासाठी लागणारी सर्व मोफत औषधे पेण येथील परेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!